-
आजच्या काळात कुटुंबासाठी कार खरेदी करणे ही केवळ चैन राहिलेली नसून ती एक गरज बनली आहे. बहुतांश मध्यवर्गीय ग्राहत बँकेच्या कर्जावरच विसंबून असतात. अशा परिस्थितीत १० ते २० लाख रुपयांचे बजेट असल्यास आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे आहे. अशा वेळी तुमचा पगार किती असावा, डाऊन पेमेंट किती भरावे आणि कर्जाचा हप्ता किती असेल, याची माहिती असायला हवी. (freepik)
-
कोणतीही बँक साधारणपणे कारच्या ऑन-रोड किमतीच्या ८० ते ८५ टक्क्यांपर्यंतच कर्ज देतात. उर्वरित रक्कम तुम्हाला स्वतःच्या खिशातून भरावी लागते. १० लाखांची कार घ्यायची असल्यास बँक तुम्हाला अंदाजे ८.५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. म्हणजे उरलेले १.५ ते २ लाख रुपये तुम्हाला ‘डाऊन पेमेंट’ म्हणून स्वतः भरावे लागतील. (canva)
-
जर तुम्ही २० लाख रुपये किमतीची कार घेत असाल तर तुम्हाला १६ लाख रुपयांपर्यंत वाहन कर्ज मिळू शकते. म्हणजे तुम्हाला ४ लाख रुपयांपर्यंत डाउनपेमेंट भरावे लागेल. (Freepik)
-
बँकिंग नियमांनुसार, तुमचा मासिक हप्ता तुमच्या पगाराच्या ५० टक्क्यांहून अधिक नसावा. जर तुम्ही ८.५ लाखांचे कर्ज ५ वर्षांसाठी ९% व्याजदराने घेतले, तर तुमचा ईएमआय साधारणपणे २०,७५८ रुपये असेल. हा हप्ता सहजपणे फेडण्यासाठी तुमचा मासिक पगार ४५,००० ते ५०,००० रुपयांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. (canva)
-
जर तुम्ही २० लाख रुपयांची कार खरेदी करणार असाल तर तुमचा मासिक हप्ता ४०,००० ते ४१,००० हजार रुपये दरम्यान असेल. म्हणजे तुमचे वार्षिक पॅकेज १० लाख रुपयांच्या पुढे असणे आवश्यक आहे. (Freepik)
-
कर्जाचा कालावधी जेवढा लांब असेल (उदा. ७ वर्षे), तेवढा ईएमआय कमी होईल, पण तुम्हाला व्याजापोटी अधिक रक्कम मोजावी लागेल. त्यामुळे ५ वर्षांपेक्षा जास्त मुदत निवडू नका. (Canva)
-
प्रत्येक बँक किंवा वित्तीय संस्था तुम्हाला कर्ज देण्याअगोदर तुमचा क्रेडिट स्कोअर तपासते. तुमचा स्कोअर ७५० च्या वर असल्यास तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते. अन्यथा बजेट वाढू शकते. (canva)
-
कार खरेदी करताना केवळ ईएमआय किंवा कारची किंमत पाहू नका.. पेट्रोल/डिझेल खर्च, विमा आणि मेंटेनन्स यांसाठीही महिन्याला किमान ४-५ हजार रुपये बाजूला ठेवावे लागतील. (canva)
-
अनेक वित्तीय संस्था १०० टक्क्यांपर्यंत कार लोन देतात. मात्र, यासाठी ते अवाढव्य व्याज आकारतात. त्यामुळे कधीही आपल्या बजेटच्या बाहेर जाऊन वाहन खरेदी करू नये. (canva)
West Bengal Election Results 2026 LIVE Updates : LIVE : भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींची ७ हजारांनी आघाडी! निकालाचा सस्पेन्स वाढला; शेवटच्या ८ फेऱ्या ठरणार ‘गेमचेंजर’