-
दैनंदिन ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सध्या पेट्रोल की इलेक्ट्रिक स्कूटर, असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. खरेदीदार अनेकदा सुरुवातीच्या किमतीचा विचार करतात, पण दीर्घकालीन खर्च पाहिल्यास वेगळेच चित्र समोर येते. (canva)
-
दररोज २० ते ३० किमी प्रवास करणाऱ्या नोकरदारांसाठी प्रत्येक रुपयाची बचत महत्त्वाची असते. शहरातील वाहतूक कोंडी आणि वारंवार थांबवे लागणारे सिग्नल यामुळे इंधन आणि बॅटरीच्या वापरावर थेट परिणाम होत असतो. दीर्घकाळाचा विचार केला तर इलेक्ट्रिक आणि पेट्रोल यांच्यात कोण फायदेशीर ठरतं याचं गणित समजून घेतलं तर निर्णय घेणे सोपं होईल. (canva)
-
दररोज तुम्ही २५ किमी प्रवास करत असाल तर महिन्याला तुमचे ७५० किलोमीटर रनिंग होते. अशा परिस्थितीत पेट्रोल स्कूटरचा विचार केल्यास शहरात ट्रॅफिकमुळे मायलेज ४०-४५ किमी प्रति लिटरपर्यंत खाली येते. पेट्रोलचा दर १०० रुपये लिटर धरल्यास प्रति किमी खर्च २.२ रुपये येतो. म्हणजेच महिन्याला सुमारे १,६५० रुपये केवळ पेट्रोलवर खर्च होतात. (canva)
-
इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण चार्जिंगसाठी ३ युनिट वीज लागते, ज्याचा खर्च २५ ते ३० रुपये येतो. ७५० किमीच्या प्रवासासाठी महिन्याला फक्त ६०० रुपये चार्जिंगचा खर्च येतो. यामुळे दरमहा साधारण १,००० रुपयांची बचत होते. (canva)
-
सुरुवातीला इलेक्ट्रिक स्कूटर महाग वाटत असली तरी ती कालांतराने परवडते. पेट्रोल स्कूटर साधारण ९०,००० रुपयांना मिळते, तर चांगली इलेक्ट्रिक स्कूटर १.५ लाखांपर्यंत जाते. हा ६०,००० रुपयांचा फरक मुख्यत्वे बॅटरीच्या किमतीमुळे असतो. (canva)
-
दररोज २५ किमी प्रवास करणारा चालक इंधनावरील बचतीद्वारे ही वाढीव रक्कम २ ते ३ वर्षांत भरून काढू शकतो. गाडीच्या देखभालीच्या खर्चातही मोठा फरक दिसून येतो. (canva)
-
पेट्रोल इंजिनला दर ३,००० किमीला इंजिन ऑईल बदलावे लागते, ज्याचा खर्च ३००-५०० रुपये असतो. फिल्टर आणि लेबर चार्जेस मिळून वर्षाला २,००० ते ३,००० रुपये खर्च होतात. (canva)
-
इलेक्ट्रिक स्कूटरला इंजिन ऑईल किंवा क्लच मेंटेनन्सची गरज नसते. दर ५००० किमीला केवळ ब्रेक पॅड्स आणि टायरची तपासणी पुरेशी ठरते. याला ५०० ते १००० रुपये लागू शकतात. मात्र, ४-५ वर्षांनंतर बॅटरी बदलण्यासाठी २०,००० ते ४०,००० रुपये खर्च येऊ शकतो. (canva)
-
पाच वर्षांच्या कालावधीत पेट्रोल वाहनाचा एकूण इंधन खर्च सुमारे ९९,००० रुपये होतो. याउलट ५ वर्षांचा चार्जिंग खर्च सुमारे ३६,००० रुपये होतो. (वर्षाला ७,२०० रुपये). जरी भविष्यात बॅटरी बदलावी लागली, तरी एकूण मालकीचा खर्च पेट्रोल स्कूटरपेक्षा कमीच राहतो. (canva)
‘हे’ पहिलं लक्षण सांगतं तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो; ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, स्टेज १ मध्ये जाण्याआधी वेळीच व्हा सावध