-
एका रात्रीत कोणी श्रीमंत होत नाही. आता तुम्ही म्हणाल लॉटरी लागली तर? इथं जरतरची गोष्ट आपण करत नसून खात्रीशीर संपत्ती निर्माण करण्याबद्दल बोलणार आहोत. श्रीमंत होण्याचे स्वप्न केवळ कष्टाने नाही, तर योग्य आर्थिक साक्षरतेने पूर्ण होते. त्यासाठी जगातील सर्वोत्तम अर्थतज्ज्ञांनी लिहिलेली ही ५ पुस्तके तुमच्या संग्रही असायलाच हवीत. (freepik)
-
द सायकोलॉजी ऑफ मनी (The Psychology of Money) : केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही, तर तुमचे भावना आणि वर्तन तुमच्या आर्थिक यशात मोठी भूमिका बजावतात. पैसा हाताळताना संयम आणि निर्णयक्षमता कशी सुधारावी, हे मॉर्गन हौसेल यांचे हे पुस्तक शिकवते.
-
रिच डॅड पुअर डॅड (Rich Dad Poor Dad) : रॉबर्ट कियोसाकी यांच्या या पुस्तकामुळे मालमत्ता आणि जबाबदारी यातील मूलभूत फरक समजतो. श्रीमंत लोक पैसे कमावण्यासाठी काम करत नाहीत, तर त्यांचे पैसे त्यांच्यासाठी काम करतात, हा विचार यात मांडला आहे.
-
द सिंपल पाथ ऑफ वेल्थ (The Simple Path to Wealth) : शेअर बाजाराची भीती वाटणाऱ्या लोकांसाठी जे. एल. कोलिन्स यांचे हे पुस्तक उत्तम आहे. कमी खर्चाचे ‘इंडेक्स फंड’ आणि कर्जापासून दूर राहून संपत्ती कशी निर्माण करावी, याचे सोपे मार्गदर्शन यात मिळते.
-
द टोटल मनी मेक ओव्हर (The Total Money Makeover) : जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली असाल, तर डेव्ह रॅम्से यांचे हे पुस्तक संजीवनी ठरेल. आपत्कालीन निधी तयार करणे आणि स्टेप-बाय-स्टेप पद्धतीने कर्जमुक्त कसे व्हायचे, याचा हा एक मास्टर प्लॅन आहे.
-
आय विव टीच यू टू बी रिच (I Will Teach You To Be Rich) : रमित सेठी यांचे हे पुस्तक तरुणांसाठी आणि नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. आपल्या आर्थिक व्यवहारांचे ऑटोमेशन करणे, क्रेडिट कार्डचा योग्य वापर आणि विनाकारण होणारे खर्च टाळून ‘जाणीवपूर्वक खर्च’ कसा करावा, हे यात दिले आहे.
-
केवळ नोकरीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे इतर मार्ग शोधणे आणि अशा गोष्टींत गुंतवणूक करणे ज्यातून तुम्हाला सतत परतावा मिळेल, हा श्रीमंत होण्याचा मुख्य पाया आहे. (freepik)
-
श्रीमंत होण्यासाठी पारंपरिक शिक्षण आणि नोकरीची व्याख्या बदलणे आवश्यक आहे. ही पुस्तके तुम्हाला साचेबद्ध विचारांच्या बाहेर पडून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याची प्रेरणा देतात. (freepik)
-
गुंतवणूक करणे ही एका रात्रीत होणारी प्रक्रिया नाही. योग्य माहितीच्या आधारे घेतलेले निर्णय आणि त्यात असलेले सातत्यच तुम्हाला दीर्घकाळात कोट्यधीश बनवू शकते. (freepik)
-
तुम्ही किती कमवता यापेक्षा तुम्ही किती वाचवता आणि ते कुठे गुंतवता, हे महत्त्वाचे आहे. या ५ पुस्तकांचे वाचन तुम्हाला केवळ श्रीमंत करणार नाही, तर ती श्रीमंती टिकवण्याची कलाही शिकवेल. (freepik)
हाय ब्लड प्रेशरला त्रास आहे? मग रोज केवळ ‘इतकी’ मिनिटे चाला, डॉक्टरांनी फायदे