-
जगातील सर्वात मोठ्या फॅशन इव्हेंटमध्ये, म्हणजेच ‘मेट गाला २०२६’ मध्ये हैदराबादच्या बिझनेस वुमन सुधा रेड्डी यांनी आपल्या लक्झरी लाइफस्टाइल आणि फॅशनने सर्वांना थक्क केले. एखाद्या अभिनेत्रीला लाजवेल असाच त्यांचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. (Instagram/@sudhareddy.official)
-
या फॅशन इव्हेंटमध्ये सुधा रेड्डी यांनी परिधान केलेल्या नेकलेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. गळ्यातील या हाराची किंमत जवळपास १४२ कोटी रुपये इतकी आहे. (Instagram/@sudhareddy.official)
-
या नेकलेसला ‘क्वीन ऑफ मेरेलानी’ (Queen of Merelani) असे नाव असून, त्यात टांझानिया येथून आणलेला ५५० कॅरेटचा गडद जांभळ्या-निळ्या रंगाचा दुर्मिळ ‘तंजानाइट’ रत्न जडलेला होता. (Instagram/@sudhareddy.official)
-
व्हिक्टोरियन शैलीत बनवण्यात आलेल्या या हाराला ‘रोझ-कट’ हिऱ्यांनी सजवण्यात आले होते, ज्यामुळे त्याला एक राजेशाही लूक मिळाला. (Instagram/@sudhareddy.official)
-
अनेकदा सेलिब्रिटी अशा कार्यक्रमांसाठी दागिने उधार घेतात, मात्र हा दुर्मिळ नेकलेस सुधा रेड्डी यांच्या वैयक्तिक संग्रहातील हिस्सा आहे. (Instagram/@sudhareddy.official)
-
सुधा रेड्डी या हैदराबादमधील दिग्गज ट्रेडिंग ग्रुप मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे संचालक कृष्ण रेड्डी यांच्या पत्नी आहेत. (Instagram/@sudhareddy.official)
-
केवळ बिझनेस टायकूनची पत्नी अशीच त्यांची ओळख नसून, त्या स्वतः MEIL ग्रुपच्या व्यवस्थापनात सक्रिय भूमिका घेत असून एक यशस्वी बिझनेस वुमन आहेत. (Instagram/@sudhareddy.official)
-
त्या ‘सुधा रेड्डी फाउंडेशन’च्या संस्थापक असून, ही संस्था शिक्षण, आरोग्य आणि बालकल्याण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य करते. (Instagram/@sudhareddy.official)
-
सुधा रेड्डी यापूर्वीही पॅरिस फॅशन वीक आणि मेट गाला सारख्या जागतिक मंचांवर भारतीय कला आणि संस्कृतीचे प्रतिनिधित्व करताना दिसल्या आहेत. (Instagram/@sudhareddy.official)
-
आपल्या लक्झरी आवडीसोबतच समाजकार्यासाठी त्या नेहमीच अग्रभागी असतात, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. (Instagram/@sudhareddy.official)
-
सुधा रेड्डी यांनी ज्या प्रकारे भारतीय अभिजातता जागतिक स्तरावर नेली आहे, ते कौतुकास्पद आहे. फॅशन आणि फायनान्स या दोन्ही क्षेत्रात त्यांची पकड मजबूत आहे. (Instagram/@sudhareddy.official)
“आयुष्यातील सर्वात वाईट दिवस…”, शाहिद कपूरने सांगितला ‘तो’ प्रसंग! ऐश्वर्या रायबरोबर ‘ताल’ सिनेमाचं शूट करताना…