-
हिंदी चित्रपट ‘पीपली लाइव’मधील ‘महंगाई डायन खाए जात है!’ हे गाणं तुमच्याही कानावर कधीतरी पडलं असेल. यापूर्वी तुम्ही ते मनोरंजन म्हणून ऐकलं असेल. मात्र, यातील दाहक वास्तव आता समजून घेण्याची खरी वेळ आली आहे. कारण, महागाई भविष्यात तुमचे सर्व आर्थिक गणित बिघडवू शकते.
-
आज जर तुम्हाला घर चालवण्यासाठी महिन्याला १५ हजार रुपये लागत असेल, तर २० वर्षांनंतरही तितक्याच पैशात काम भागेल असे मानणे चुकीचे आहे. काळासोबत गोष्टी महाग होतात आणि तुमच्या उत्पन्नावरचा दबाव वाढत जातो, त्यामुळे भविष्यातील नियोजनासाठी आजचा नव्हे तर उद्याचा खर्च समजून घेणे आवश्यक आहे. (freepik)
-
इन्फ्लेशन म्हणजेच महागाई तुमची खरेदी करण्याची ताकद हळूहळू कमी करत असते. जर आपण ६% वार्षिक महागाईचा दर गृहीत धरला, तर दर १२ वर्षांनी तुमचा खर्च दुप्पट होतो. म्हणजेच आज जी वस्तू १०० रुपयांना मिळते, ती २० वर्षांनंतर ३०० रुपयांहून अधिक महाग होऊ शकते. (freepik)
-
या हिशोबाने आज जर घरखर्चाला तुम्हाला १५ हजार रुपये लागत असेल तर २० वर्षांनंतर सुमारे ४८ हजार रुपये लागू शकतात. जर तुमचा आजचा खर्च २० हजार असेल, तर तो ६४ हजारांवर पोहोचेल आणि २५ हजारांचा खर्च भविष्यात ८० हजार रुपये प्रति महिना इतका वाढू शकतो. (freepik)
-
सध्या तुम्ही १५ ते २५ हजार रुपयांमध्ये जी जीवनशैली जगत आहात, तीच टिकवून ठेवण्यासाठी भविष्यात ५० ते ८० हजार रुपयांची गरज पडेल. जर आतापासून योग्य गुंतवणूक केली नाही, तर भविष्यात तुमच्या राहणीमानाचा दर्जा खालावण्याची शक्यता नाकारता येत नाही. (canva)
-
अनेकांना वाटते की खर्च वाढला तरी उत्पन्नही वाढेल, पण प्रत्येकाची कमाई महागाईच्या वेगाने वाढतेच असे नाही. जर तुमच्या उत्पन्नाची वाढ ६ टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर तुमची क्रयशक्ती कमी होत आहे आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागे पडत आहात, हे लक्षात घेतले पाहिजे. (canva)
-
भविष्यात केवळ महागाईच नाही, तर कौटुंबिक जबाबदाऱ्याही वाढतात. मुलांचे शिक्षण, लग्न, पालकांचे आरोग्य आणि आपत्कालीन खर्च हे तुमच्या नियोजित बजेटच्या बाहेर असू शकतात. या वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे तुमचा प्रत्यक्ष खर्च अंदाजापेक्षा कितीतरी पटीने जास्त असू शकतो. (canva)
-
निवृत्तीनंतर ३० हजार रुपये महिना पुरेसा होईल, असा आजचा अंदाज भविष्यात चुकीचा ठरू शकतो. कारण २०-२५ वर्षांनंतर ही गरज ७० ते ९० हजार रुपयांपर्यंत पोहोचलेली असेल. योग्य वेळी अंदाज न घेतल्यास निवृत्तीनंतर मोठा आर्थिक ताण निर्माण होऊ शकतो. (canva)
-
महागाईला हरवण्यासाठी केवळ पैसे वाचवणे पुरेसे नाही, तर ते योग्य ठिकाणी गुंतवून वाढवणेही महत्त्वाचे आहे. जर पैसे फक्त बचत खाते किंवा एफडीमध्ये ठेवले, तर त्यातून मिळणारा परतावा महागाईच्या तुलनेत कमी असल्याने तुमच्या पैशांचे मूल्य कमीच होत राहते. (freepik)
-
महागाईवर मात करण्यासाठी पोर्टफोलिओमध्ये विविधता असणे गरजेचे आहे. केवळ सुरक्षित पर्यायांवर अवलंबून न राहता इक्विटी, सोने आणि काही महत्त्वाच्या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास महागाईच्या वेगापेक्षा जास्त परतावा मिळवणे शक्य होते. (Ai)
-
तुमची आर्थिक योजना नेहमी आजच्या खर्चाच्या आधारावर न बनवता पुढील २० वर्षांतील संभाव्य खर्चाचा विचार करून आखली पाहिजे. भविष्यातील गरजांचे वास्तववादी आकलन करूनच आजपासून गुंतवणुकीची शिस्त लावणे हाच आर्थिक सुरक्षिततेचा एकमेव मार्ग आहे. (freepik)
CJP मधून हकालपट्टी झाल्यावर विजेता दहियाची प्रतिक्रिया, “मी यापुढेही बर्गर खाणारच”, व्हायरल व्हिडीओचा वाद काय?