-
बिहार आणि झारखंड विभागाचे प्राप्तिकर प्रधान मुख्य आयुक्त डॉ. डी. सुधाकर राव यांनी गुरुवारी माहिती दिली की, गेल्या आर्थिक वर्षात महेंद्रसिंग धोनी हा या दोन्ही राज्यांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक कर भरणारा व्यक्ती ठरला आहे.
-
धोनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने बिहार आणि झारखंडमधून सर्वाधिक कर भरण्याचा मान मिळवत आहे. निवृत्तीनंतरही त्याच्या या लोकप्रियतेत आणि कमाईत कोणतीही घट झालेली नाही.
-
धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सध्या तो फक्त आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळतो, तरीही जाहिराती आणि इतर गुंतवणुकीतून त्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर आहे.
-
गेल्या आर्थिक वर्षात (२०२५-२६) बिहार आणि झारखंडमधून एकूण २०,००० कोटी रुपयांचा प्राप्तिकर जमा झाला आहे. एकूण २०,००० कोटी रुपयांच्या कर संकलनापैकी एकट्या झारखंड राज्याचा वाटा १२,००० कोटी रुपये इतका आहे. झारखंडमध्ये खाणकाम आणि इतर औद्योगिक हालचालींमुळे कराचा मोठा हिस्सा जमा होतो.
-
एकूण कर संकलनापैकी सुमारे ७० टक्के रक्कम ही ‘टीडीएस’ माध्यमातून जमा झाली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
-
गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे झारखंडमधील खाणकाम काही प्रमाणात प्रभावित झाले होते, ज्याचा परिणाम कर संकलनावर झाला. चालू आर्थिक वर्षात हा टप्पा २०,००० कोटींच्या पुढे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-
२०२२-२३ या आर्थिक वर्षात धोनीने सुमारे ३८ कोटी रुपये आगाऊ कर म्हणून भरले होते. यावरून त्याच्या एकूण उत्पन्नाचा अंदाज लावला जाऊ शकतो.
-
प्राप्तिकर विभागाने या वेळी धोनीने नेमका किती कर भरला, याची अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. केवळ तो या विभागातून सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती आहे, एवढेच स्पष्ट केले आहे.
-
धोनी सध्या दुखापतीतून सावरत असून आयपीएल २०२६ च्या हंगामात त्याने अद्याप एकही सामना खेळलेला नाही. मात्र, तरीही मैदानाबाहेरील त्याच्या ‘ब्रँड व्हॅल्यू’मुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (PTI Photo)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत