-
बँकेत कामाच्या वेळेत सेवा देणे हे कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, ग्राहकांना कामासाठी विनाकारण ताटकळत ठेवणे किंवा टाळाटाळ करणे हा नियमांचा भंग मानला जातो. भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना काही महत्त्वाचे अधिकार दिले आहेत, ज्याद्वारे तुम्ही अशा कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करू शकता.
-
बँकांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी लंच ब्रेक असला तरी, तो सर्व कर्मचाऱ्यांसाठी एकाच वेळी नसतो. एका कर्मचाऱ्याच्या जागी दुसऱ्याने सेवा देणे आवश्यक आहे, जेणेकरून ग्राहकांचे काम थांबू नये.
-
जर एखादा कर्मचारी कामात दिरंगाई करत असेल, तर शांत बसण्याऐवजी सर्वप्रथम त्या बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडे किंवा नोडल ऑफिसरकडे जाऊन तोंडी किंवा लेखी तक्रार देऊ शकता. (कॅन्वा)
-
जर मॅनेजरकडे तक्रार करुनही कारवाई झाली नाही. तर प्रत्येक बँकेत ‘तक्रार निवारण मंच’ असतो. तुम्ही बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून किंवा त्यांच्या ऑनलाइन पोर्टलवर तुमची तक्रार अधिकृतपणे नोंदवू शकता.
-
बँकांमध्ये ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र नोडल ऑफिसरची नेमणूक केलेली असते. बँकेच्या नोटीस बोर्डवर किंवा वेबसाईटवर त्यांचा संपर्क क्रमांक मिळवून तुम्ही थेट दाद मागू शकता. (कॅन्वा)
-
जर बँकेच्या स्तरावर ३० दिवसांच्या आत तुमच्या तक्रारीचे निवारण झाले नाही, तर तुम्ही थेट ‘बँकिंग लोकपाल’कडे दाद मागू शकता. याद्वारे कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होऊ शकते. (कॅन्वा)
-
आरबीआयच्या तक्रार व्यवस्थापन प्रणालीद्वारे तुम्ही https://cms.rbi.org.in](https://cms.rbi.org.in या वेबसाईटवर जाऊन ‘File A Complaint’ या पर्यायावर क्लिक करून घरबसल्या तक्रार नोंदवू शकता.
-
ग्राहक आपली तक्रार CRPC@rbi.org.in या ईमेल आयडीवर पाठवू शकतात. तसेच, रिझर्व्ह बँकेने ग्राहकांसाठी १४४४८ हा टोल फ्री क्रमांक दिला आहे, ज्यावर कॉल करून तुम्ही तुमची समस्या मांडू शकता.
-
बँकिंग लोकपालकडे केलेली तक्रार गांभीर्याने घेतली जाते. यामुळे केवळ तुमच्या समस्येचे निवारण होत नाही, तर संबंधित कामचुकार कर्मचाऱ्याला शिस्त लावण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली? मुख्यमंत्र्यांसह सरकारला थेट इशारा