-
एकेकाळी भारतात केजीएफ नावाची मोठी सोन्याची खाण होती. मात्र, सध्याच्या स्थितीला भारतामध्ये सोन्याचे उत्पादन अत्यंत कमी होत असल्याने गरजेचा बहुतांश भाग परदेशातून आयात केला जातो. यामध्ये स्वित्झर्लंडचा वाटा सर्वाधिक (४०%) असून, उर्वरित सोने संयुक्त अरब अमिराती, दक्षिण आफ्रिका आणि पेरू यांसारख्या देशांतून येते.
-
भारतात सोने खरेदी फक्त गुंतवणूक नाही तर तो परंपरेचा भाग मानला जातो. परिणामी देशात दरवर्षी सुमारे ८०० ते ९०० टन सोन्याचा वापर होतो. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते, भारतात दररोज सरासरी २.२ टन सोने खरेदी केले जाते, ज्याचे मूल्य अंदाजे २००० ते २२०० कोटी रुपये इतके असते.
-
देशात सर्वाधिक सोने हे दागिन्यांच्या रूपात खरेदी केले जाते. उदाहरणार्थ, २०२४ मध्ये ७२४ टन सोने आयात झाले होते, त्यापैकी ५६३ टन सोन्याची विक्री दागिन्यांच्या स्वरूपात झाली होती, तर उर्वरित सोन्याची विक्री नाणी आणि बिस्किटांच्या रूपात झाली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सोने खरेदीचा ट्रेंड बदलत असून लोक आता फिजिकलपेक्षा डिजिटल गोल्ड सारख्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करत आहेत.
-
भारतात दरवर्षी सुमारे १ कोटी विवाह सोहळे होतात. लग्नाच्या एकूण बजेटमधील २० ते ३० टक्के खर्च केवळ सोन्यावर केला जातो. याशिवाय अक्षय तृतीया आणि धनत्रयोदशी सारख्या सणांना सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. (कॅन्वा)
-
गाव आणि निमशहरी भागात सोने ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. बँका किंवा शेअर बाजारापेक्षा कठीण काळात सोने त्वरित मदतीला येईल, असा विश्वास ग्रामीण कुटुंबांना आजही वाटतो.
-
सोन्याच्या आयातीसाठी भारताला मोठ्या प्रमाणावर डॉलर्स परदेशात पाठवावे लागतात. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या ११ महिन्यांत भारताने सुमारे ६९ अब्ज डॉलर्स (सुमारे ६ लाख कोटी रुपये) किमतीचे सोने आयात केले, जे मागील वर्षाच्या तुलनेत २९ टक्क्यांनी जास्त आहे.
-
जेव्हा डॉलरचा ओघ परदेशात वाढतो, तेव्हा भारतीय रुपया कमकुवत होतो आणि परकीय चलन साठ्यावर दबाव येतो. मार्च २०२६ मध्ये भारताच्या परकीय चलन साठ्यात ४० अब्ज डॉलर्सहून अधिक घट झाली असून देशाचा व्यापार घाटा वाढून ११९.३० अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.
-
जर नागरिकांनी सोन्याची खरेदी कमी केली, तर देशाचा आयात खर्च कमी होईल. यामुळे डॉलरची बचत होऊन परकीय चलन साठा मजबूत राहील आणि अर्थव्यवस्थेला स्थिरता मिळेल.
-
केवळ सोन्यावर अवलंबून न राहता बँका, बॉण्ड्स, शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड यांसारख्या पर्यायांकडे गुंतवणूक वळवणे हा यावरील एक दीर्घकालीन उपाय ठरू शकतो.
आईशप्पथ, या पोरी म्हणजे… ‘मी छत्तीस नखरेवाली’ गाण्यावर तरुणी झाल्या बेभान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नादखुळा नाचलात पोरींनो …”