-
लुई फिलिप : एका फ्रेंच राजाचे नाव असलेल्या या ब्रँडचा उगम प्रत्यक्षात भारतात झाला आहे. लुई फिलिप हा ‘मदुरा फॅशन अँड लाइफस्टाइल’चा एक ब्रँड असून तो आदित्य बिर्ला फॅशन अँड लाइफस्टाइलचा एक विभाग आहे. किफायतशीर लक्झरी कपड्यासाठी प्रसिद्ध आहे.
-
ॲलन सोली : या ब्रँडची मार्केटिंग आणि जाहिरात पाहून याला कोणीही भारतीय म्हणणार नाही. पण, ऑफिस वेअरला नवी ओळख देणारा हा एक प्रिमियर भारतीय ब्रँड आहे. हा देखील आदित्य बिर्ला समूहाच्या मदुरा फॅशनचाच भाग असून कपड्यांव्यतिरिक्त ते ॲक्सेसरीज, बॅग्स आणि मुलांचे कपडे देखील तयार करतात.
-
जॅग्वार : मूळ कंपनी ब्रिटिश असली तरी ‘जॅग्वार’ची मालकी आता भारतीय टाटा मोटर्सकडे आहे. ही लक्झरी वाहने जगभरातील सेलिब्रिटी आणि श्रीमंत वर्गात खूप प्रसिद्ध आहे.
-
पीटर इंग्लंड : या नावामुळे तर अनेक लोक फसतात. वाचून आश्चर्य वाटेल हा ब्रँड देखील मदुरा फॅशन अँड लाइफस्टाइलचा एक उपक्रम आहे. हा ब्रँड पुरुषांच्या फॉर्मल आणि कॅज्युअल वेअरसाठी भारतातील सर्वात विश्वासार्ह मानला जातो.
-
दा मिलानो : साहिल मलिक यांना २००० मध्ये वडिलांकडून हा व्यवसाय वारशात मिळाला. आज जगभरात या ब्रँडची साखळी पाहायला मिळते. पाश्चिमात्य डिझाइनचा स्पर्श असलेल्या लेदर बॅग्स आणि बुटांसाठी हा ब्रँड भारत आणि मध्यपूर्वेमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.
-
अमेरिकन स्वान : नाव जरी अमेरिकन असलं तरी हा ब्रँक पूर्णपणे भारतीय आहे. या ब्रँडची स्थापना २०१२ मध्ये भारतात झाली. सँडल, पोलो शर्ट्स, दागिने आणि हँडबॅग्स यांसारख्या उत्पादनांच्या माध्यमातून ह्या ब्रँडने अमेरिकेतील फॅशन भारतीयांना उपलब्ध करुन दिली आहे.
-
फ्लाइंग मशीन : हा ब्रँड अरविंद लिमिटेडच्या (पूर्वीचे अरविंद मिल्स) मालकीचा आहे, जे १९९८ मध्ये जगातील तिसरे सर्वात मोठे डेनिम उत्पादक होते. ८० वर्षांचा वारसा असलेल्या या व्यवसायाने २०१३ मध्ये डिजिटल युगात प्रवेश करत ऑनलाइन आणि ऑफलाईन विक्रीस सुरुवात केली आहे.
-
वॅन हुसेन : मदुरा फॅशन अँड लाइफस्टाइलचा आणखी एक ब्रँड म्हणजे ‘वॅन हुसेन’. पुरुषांसाठी जॅकेट, पादत्राणे आणि शर्ट्स तसेच महिलांसाठी ड्रेसेस, टॉप्स आणि जीन्सची मोठी श्रेणी या ब्रँडकडे आहे.
-
लॅक्मे : लॅक्मे हा भारतातील पहिला मेकअप ब्रँड असून तो आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजत आहे. १९५२ मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या विनंतीवरून जेआरडी टाटा यांनी याची स्थापना केली. लॅक्मे त्वचेची काळजी आणि रंगांच्या उत्पादनांसाठी प्रसिद्ध असून, लॅक्मे फॅशन वीकद्वारे फॅशन जगातही सक्रिय आहे.
-
रॉयल एनफिल्ड : तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली ही बाईक मुळात परदेशी बनावटीची असली तरी १९५५ पासून ती पूर्णपणे भारतीय उत्पादन आहे. मद्रास मोटर्सने रेडिच कंपनीसोबत भागीदारी करून ‘एनफिल्ड इंडिया’ची स्थापना केली. तेव्हापासून चेन्नईतील तिरुवोट्टियुर येथे याचे उत्पादन सुरू आहे.
Uday Kotak: “मोठ्या धक्क्यासाठी तयार राहा, वेळ कमी आहे!”; कोटक महिंद्रा बँकेच्या संस्थापकांनी दिला इशारा