-
नवीन कार खरेदी करताना ग्राहक ५ स्टार सेफ्टी रेटिंग आवर्जून पाहतो. यासाठी लोक जास्त पैसेही मोजायला तयार असतात. ऑटोमोबाईल कंपन्या देखील मार्केटिंगसाठी या रेटिंगचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. माहिती अधिकारात ५ स्टार सेफ्टी रेटिंगबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.
-
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील कारच्या सुरक्षिततेची चाचणी करून त्यांना १ ते ५ स्टार रेटिंग देणाऱ्या ‘भारत एनसीएपी’ या संस्थेअंतर्गत आतापर्यंत ३५ कार मॉडेल्सची क्रॅश टेस्ट करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही एक मोठी आकडेवारी मानली जाते.
-
RTI मधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आतापर्यंत ज्या ३५ गाड्यांची चाचणी झाली, त्या सर्व गाड्या संबंधित कंपन्यांनी स्वतःहून टेस्टिंगसाठी पाठवल्या होत्या. वास्तविक, सरकारी संस्था कोणत्याही कंपनीच्या वाहनाची स्वतःहून निवड करू शकते. पण, त्यांनी हा अधिकार वापरला नाही.
-
अनेक लोकप्रिय गाड्यांची फायनल रेटिंग जाहीर करण्यापूर्वी त्यांची पुन्हा चाचणी किंवा पुनर्मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये मारुति सुझुकी डिझायर, टाटा पंच, टाटा सिएरा, टाटा कर्व, महिंद्रा XUV 3XO, महिंद्रा XUV400 EV आणि महिंद्रा BE 6 या गाड्यांचा समावेश आहे. (AI)
-
या चाचणीमध्ये सर्व गाड्यांना ‘भारत एनसीएपी’मध्ये ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. यामुळे चाचणीच्या प्रक्रियेवर ग्राहकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
-
मंत्रालयाने स्पष्ट केल्यानुसार, ही प्रक्रिया AIS-197 नियमांच्या कलम ६.२ अंतर्गत केली जाते. जर पहिल्या चाचणीत डेटा अपूर्ण असेल किंवा तांत्रिक बाबी निकषांशी जुळत नसतील, तर शास्त्रोक्त अचूकतेसाठी पुन्हा चाचणी घेण्याचा नियम आहे.
-
तज्ज्ञांच्या मते, पुन्हा चाचणी घेण्याचा अर्थ असा नाही की ती गाडी पहिल्या टेस्टमध्ये अपयशी ठरली. उलट, अंतिम निकाल अधिक अचूक आणि वैज्ञानिकदृष्ट्या योग्य असावा, हा यामागचा मुख्य उद्देश असतो. (कॅन्वा)
-
केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील इतर सेफ्टी प्रोग्राम्समध्ये देखील पुनर्मूल्यांकन ही एक सामान्य प्रक्रिया मानली जाते. मानवी किंवा तांत्रिक चुका सुधारण्यासाठी ही पद्धत जगभर वापरली जाते. (कॅन्वा)
-
ही प्रक्रिया कायदेशीर असली, तरी सरकारने स्वतःहून गाड्यांची निवड न केल्यामुळे या रेटिंग सिस्टिमच्या पारदर्शकतेवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. भविष्यात सरकार रँडम पद्धतीने गाड्या निवडून त्यांची चाचणी करेल का? याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. (कॅन्वा)
प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! मान्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण