-
आर्थिक नियोजनाचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे आणीबाणी निधी तयार ठेवणे. सामान्यतः ३ महिन्यांचा खर्च पुरेसा मानला जात असला, तरी सध्याच्या अनिश्चित वातावरणात किमान ६ ते १२ महिन्यांचा घरखर्च भागेल इतकी रक्कम बाजूला ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये घराचे भाडे, गृहकर्ज किंवा इतर कर्जांचे हप्ते, मुलांची फी, किराणा आणि नियमित बिलांचा समावेश असावा. (Canva)
-
बहुतांश नोकरदार कर्मचारी केवळ कंपनीकडून मिळणाऱ्या आरोग्य विम्यावर अवलंबून असतात. मात्र, नोकरी सुटल्यास किंवा बदलण्याच्या काळात हा कॉर्पोरेट विमा तात्काळ बंद होतो. म्हणूनच, कंपनीच्या विम्याव्यतिरिक्त स्वतःच्या आणि कुटुंबाच्या नावावर एक स्वतंत्र, वैयक्तिक आरोग्य विमा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (Canva)
-
आरोग्य विम्याप्रमाणेच कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी पुरेसा कव्हरेज असलेला टर्म लाईफ इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. जर तुमच्यावर कुटुंब अवलंबून असेल आणि काही गृहकर्ज किंवा इतर आर्थिक भार असेल, तर तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान १० ते १५ पट कव्हरेज असणारा टर्म प्लॅन निवडावा. (Canva)
-
पूर्वीसारखे आता एकाच उत्पन्नावर विसंबून राहण्याचा काळ गेला आहे. आपल्या मुख्य नोकरीव्यतिरिक्त फ्रीलान्सिंग, कन्सल्टिंग, ऑनलाईन टीचिंग किंवा आपल्या आवडीच्या क्षेत्रातील इतर कामांच्या माध्यमातून उत्पन्नाचा दुसरा पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे मुख्य नोकरीवर काही संकट आल्यास पूर्णपणे आर्थिक कोंडी होत नाही. (Canva)
-
‘सर्व अंडी एकाच बास्केटमध्ये ठेवू नका’, प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे यांचं हे वाक्य गुंतवणूक करताना लक्षात ठेवा. शेअर बाजारातील गुंतवणुकीसोबतच पोर्टफोलिओमध्ये स्थैर्य आणण्यासाठी निश्चित परतावा देणाऱ्या साधनांचा समावेश करावा. बँक मुदत ठेव किंवा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी यांसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास नियमित व्याज मिळत राहते. कठीण काळात ही सुरक्षित गुंतवणूक मानसिक आधार देण्याचे काम करते. (Canva)
-
उत्पन्नाचे साधन धोक्यात येण्यापूर्वी आपल्यावरील कर्जाचे प्रमाण नियंत्रित करणे आवश्यक आहे. क्रेडिट कार्डचे थकीत बिल किंवा वैयक्तिक कर्ज यांसारखी जास्त व्याजदर असलेली कर्जे प्राधान्याने फेडून टाकावीत. जर गृहकर्ज किंवा वाहनकर्ज सुरू असेल, तर उत्पन्नातील काही भाग वापरून मुद्दल अंशतः फेडण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे नोकरीत बदल झाल्यास खिशावर ताण पडणार नाही. (Canva)
-
बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःला कालबाह्य होऊ न देणे हीच सर्वात मोठी गुंतवणूक आहे. यासाठी दरमहा आपल्या उत्पन्नातील एक छोटा हिस्सा ‘लर्निंग किंवा अपस्किलिंग फंड’ म्हणून बाजूला ठेवावा. या निधीचा वापर एआय टूल्स शिकण्यासाठी, सर्टिफिकेशन कोर्सेस करण्यासाठी किंवा नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी करावा, ज्यामुळे जॉब मार्केटमध्ये तुमची मागणी कायम राहील. (Canva)
-
आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्यासाठी आपल्या ‘गरजा’ आणि ‘इच्छा’ यांमधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. महागड्या गॅजेट्सची खरेदी, वारंवार होणारे हॉटेलिंग किंवा अनावश्यक सबस्क्रिप्शन्स यांसारख्या लक्झरी खर्चांवर तात्पुरते नियंत्रण ठेवावे. (Canva)
-
जर कुटुंबामध्ये पती-पत्नी दोन्ही कमावते असतील, तर दोघांनी मिळून संयुक्त आर्थिक नियोजन करावे. एकाच्या नोकरीवर परिणाम झाल्यास दुसऱ्याच्या उत्पन्नातून घराचा गाडा कसा चालवता येईल, याचे नियोजन आधीच तयार असावे. घरखर्च एकाच्या पगारातून भागवून दुसऱ्याचा पगार संपूर्णपणे बचत आणि गुंतवणुकीसाठी वापरल्यास कठीण काळात कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळतो. (Canva)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…