-
ईपीएफओ सदस्यांना आता त्यांचा पीएफ बॅलन्स तपासणे, शेवटचे ५ आर्थिक व्यवहार पाहणे आणि आपल्या पीएफ क्लेमचे स्टेटस ट्रॅक करणे यांसारख्या सेवा थेट व्हॉट्सॲपवर उपलब्ध होणार आहेत.
-
‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ (PMVBRY) अंतर्गत पात्र असलेल्या ज्या सदस्यांचे आधार पडताळणी किंवा बँकेशी आधार लिंक नसणे अशी कामे प्रलंबित आहेत, त्यांनाही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विशेष साहाय्य केले जाईल. (कॅन्वा)
-
ही सेवा सुरू करण्यासाठी सदस्यांना ईपीएफओच्या अधिकृत व नोंदणीकृत व्हॉट्सॲप नंबरवर फक्त ‘Hello’ (हॅलो) असा मेसेज टाईप करून पाठवावा लागेल. याशिवाय सदस्य आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर ईपीएफओचे मेसेज मिळवण्याचा पर्यायही निवडू शकतात.
-
एखादा मेसेज आल्यानंतर ईपीएफओ यंत्रणा आधी त्याची पडताळणी करेल. पाठवलेला मेसेज हा सदस्याच्या ‘युनिव्हर्सल अकाउंट नंबर’ म्हणजेच युएएनशी लिंक असलेल्या अधिकृत मोबाईल नंबरवरूनच आला आहे की नाही, हे तपासले जाईल.
-
मोबाईल नंबरची पडताळणी यशस्वी झाल्यानंतर, सदस्यांच्या स्क्रीनवर त्यांच्या स्थानिक किंवा प्रादेशिक भाषेत एक सोपा ‘मेनू’ पर्याय दिसेल. त्यातील पर्याय निवडून किंवा सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन सदस्य पुढे जाऊ शकतील.
-
ईपीएफओच्या बाजूने या संदेशांवर प्रतिसाद देण्यासाठी एक ‘एआय चॅटबॉट’ असणार आहे. हा चॅटबॉट किंवा ईपीएफओचा मुख्य डेटाबेस सदस्यांच्या प्रश्नांची रिअल-टाइम उत्तरे थेट व्हॉट्सॲपवर देईल.
-
या सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही व्हॉट्सॲप सेवा सदस्यांसाठी २४ तास आणि सातही दिवस उपलब्ध असेल. त्यामुळे सरकारी सुट्ट्यांच्या दिवशीही ग्राहकांना ताटकळत राहावे लागणार नाही.
-
देशातील बहुतांश नागरिक व्हॉट्सॲप वापरत असल्याने ही पद्धत अत्यंत सोयीची ठरेल. तसेच सर्व संवाद स्थानिक व प्रादेशिक भाषांमध्ये होणार असल्याने सर्वसामान्य कामगारांना ईपीएफओशी संपर्क साधणे अधिक सोपे आणि सुटसुटीत होणार आहे.
-
या सुविधेमुळे प्रत्येक संवादाचे आणि ग्राहकांच्या समाधानाचे मूल्यमापन करणे ईपीएफओला शक्य होईल. यामुळे भविष्यात आपल्या सेवा अधिक चांगल्या प्रकारे सुधारण्यास ईपीएफओला मदत होईल.
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारला! सरकारने पदावनती केल्याची मुंढेची भावना; दीड महिना ठेवलेले प्रतीक्षेत