-
वैद्यकीय क्षेत्रात रुग्णाचे निदान करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत होऊ शकते. परंतु, शस्त्रक्रिया, रुग्णाची प्रत्यक्ष तपासणी आणि त्यांच्याशी संवाद साधणे यासाठी मानवी डॉक्टर्सची जागा कोणीही घेऊ शकत नाही. एआय कधीही माणसाचा जीव वाचवण्याचे थेट निर्णय घेऊ शकत नाही. (canva)
-
रुग्णालयात किंवा वृद्धाश्रमात रुग्णांची काळजी घेणाऱ्या नर्सेस आणि केअर-टेकर्स यांच्या नोकऱ्या कधीच धोक्यात येणार नाहीत. आजारी व्यक्तीला औषधांसोबतच ‘मानवी स्पर्शाची’, आपुलकीची आणि मानसिक आधाराची गरज असते, जे मशीन कधीच देऊ शकत नाही. (canva)
-
घरातील एसी, फ्रीज किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती असो, प्लंबिंगचे काम असो या प्रत्येक कामात जागेवर जाऊन परिस्थितीनुसार कौशल्य वापरावे लागते. या तांत्रिक आणि शारीरिक कौशल्यांचे ऑटोमेशन करणे अशक्य आहे. (canva)
-
इमारतींचे नकाशे एआय बनवू शकेल. परंतु, प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन वीट रचणे, पाया खणणे आणि कष्टाने इमारत उभी करणे यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. (canva)
-
शेती हा पूर्णपणे निसर्ग, हवामान आणि जमिनीच्या सुपीकतेवर अवलंबून असलेला व्यवसाय आहे. ट्रॅक्टर किंवा ड्रोनसारखी साधने शेतीत मदत करू शकतात. परंतु, पिकांची प्रत्यक्ष काळजी घेणे, झाडांची पारख करणे आणि शेतातील रोजची कामे करणे यासाठी मानवी श्रमाची गरज कायम राहील. (canva)
-
स्वयंपाक करणे ही एक कला आहे, ज्यामध्ये चवीचे ज्ञान महत्त्वाचे असते. हॉटेल्समध्ये शेफने बनवलेल्या अन्नाची चव आणि वेटर्सनी ग्राहकांना आदराने दिलेली सर्व्हिस ही हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचा पाया आहे. ही जागा रोबोट्स पूर्णपणे घेऊ शकत नाहीत. (canva)
-
पोलीस, सुरक्षा रक्षक किंवा लष्कर यांसारख्या सुरक्षा सेवांमध्ये धोक्याच्या वेळी तातडीने आणि प्रसंगावधान राखून निर्णय घ्यावे लागतात. गुन्हेगारी रोखण्यासाठी किंवा अचानक उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी मानवी बुद्धी आणि शौर्याला कोणताही पर्याय नाही. (canva)
-
समाजातील वंचित घटकांना मदत करणे, मानसिक तणावात असलेल्या लोकांचे समुपदेशन करणे ही कामे भावनेशी जोडलेली असतात. एआयमध्ये मानवी भावना नसल्यामुळे सामाजिक सेवा क्षेत्रात केवळ माणूसच काम करू शकतो. (canva)
-
मोठमोठ्या इमारतींचा परिसर, बागा, उद्याने यांची प्रत्यक्ष देखभाल करणे आणि स्वच्छता राखणे या कामांसाठी मानवी देखरेखीची आवश्यकता असते. इथं रोबोट किंवा एआय आणून उपयोग नाही. (canva)
प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! मान्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण