-
Sai Sudharsan IPL 2026 Gujarat Titans Net Worth Salary and Luxury Villa Photos: गुजरात टायटन्स काल झालेल्या क्वालिफायर २ सामन्यात राजस्तान रॉयल्सचा पराभव करत आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. गुजरात टायटन्सच्या या विजयात कर्णधार शुभमन गिलचे शतक आणि सलामीवीर साई सुदर्शनच्या ५८ धावांचा सिंहाचा वाटा होता.
-
या सामन्यात साई सुदर्शनने अर्धशतकासह सलग दुसऱ्या हंगामात ७०० धावा करण्यााच पराक्रम केला. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो ७१० धावांसह तिसऱ्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी राजस्तानचा वैभव सुर्यवंशी आणि दुसऱ्या स्थानी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आहे.
-
आयपीएल २०२५ मध्येही साई सुदर्शनने दमदार कामगिरी केली होती. ७५९ धावांसह त्याने ऑरेंज कॅपचा मानही मिळवला होता.
-
आंतरराष्ट्रीय पातळीवर आतापर्यंत जास्त संधी न मिळालेल्या साई सुदर्शनने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मात्र जोरदार कामगिरी केली आहे. यामुळे आयपीएलच्या माध्यमातून त्याने आतापर्यंत १७.६० कोटी रुपयांच्या कमाई केली आहे.
-
साई सुदर्शनला २०२२ मध्ये पहिल्यांदा आयपीएल खेळायची संधी मिळाली. त्यावेळी गुजरात टाटन्सने त्याला २० लाख रुपयांना करारबद्ध केले होते. २०२२ ते २०२४ असे तीन वर्षे त्याला वार्षिक २० लाख रुपये मानधन मिळत होते.
-
पुढे २०२५ च्या लिलावात साई सुदर्शनला गुजरात टायटन्सने ८.५० कोटी रुपयांना करारबद्ध केले. यामुळे त्याच्या मानधात तब्बल ४१५० टक्क्यांची वाढ झाली. तसेच २०२६ च्या आयपीएल साठीही त्याला ८.५० कोटी रुपयांचे मानधन मिळाले आहे.
-
साई सुदर्शन याच्या मालकीचा तामिळनाडूतील चेन्नईमध्ये एक आलिशान व्हिला आहे. ६ ते ८ कोटी रुपयांच्या दरम्यान अंदाजित मूल्य असलेली ही मालमत्ता, क्रिकेटमधील कामगिरीमुळे त्याच्या संपत्तीत होत असलेली प्रगती दर्शवते.
-
साई सुदर्शनचा हा व्हिला चेन्नईच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा निवासी भागांपैकी एका भागात आहे. या व्हिलाची रचना आधुनिक सुविधा आणि अत्यंत आकर्षक अंतर्गत सजावट यांचा सुरेख मेळ साधते.
-
१५ ऑक्टोबर २००१ चेन्नईत जन्मलेला साई सुदर्शन सध्या २४ वर्षांचा आहे. तो डावखुरा फलंदाज असून, लेग स्पिन गोलंदाजीही करतो.
-
क्रीडा क्षेत्राची पार्श्वभूमी असलेल्या साई सुदर्शनच्या वडिलांनी राज्य स्तरावर ॲथलेटिक्समध्ये प्रतिनिधित्व केले होते, तर त्याची आई व्हॉलीबॉलशी संबंधित होती. (All Photos: Sai Sudarshan/Instagram)
एकेकाळी करोडपती होते, आज रस्त्यावर झोपतात! आजोबांनी सांगितलं, फक्त ‘या’ गोष्टीमुळे झाली वाईट अवस्था; VIDEO पाहून धक्का बसेल…