-
बजाज चेतक २५०१ (Bajaj Chetak 2501) : बजाजच्या या सर्वात लेटेस्ट स्कूटरमध्ये जुन्या चेतकचा रेट्रो लूक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम संगम पाहायला मिळतो. भारतीय बाजारपेठेत याची एक्स शोरूम किंमत सुमारे ९१,५०४ रुपये इतकी आहे. यात २.५ kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला असून, एका चार्जमध्ये ही स्कूटर ११३ किमीची रेंज देते असा कंपनीचा दावा आहे.
-
चेतकचे सर्वात मोठं वैशिष्ट्ये म्हणजे पूर्णपणे मेटल बॉडी. त्यामुळे कोणत्याही इलेक्ट्रिक स्कूटर अधिक टिकाऊ आणि दिसायला प्रीमियम वाटते. याशिवाय, ग्राहकांनी ‘TecPac’ हा ऑप्शन निवडल्यास त्यांना हिल होल्ड असिस्ट, स्पोर्ट आणि इको मोड्स, म्युझिक कंट्रोल्स आणि गाईड-मी-होम लाइटिंग यांसारखे फीचर्स मिळतात.
-
एथर ४५०एक्स (Ather 450X) : एथर ही तिच्या परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. त्यातही एथर ४५०एक्स हे मॉडेल अल्पावधीत तरुणांच्या पसंतीस उतरले आहे. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे १.३१ लाख रुपये आहे. यात ७ इंचाचा टीएफटी टचस्क्रीन, गुगल मॅप्स सपोर्ट, क्रूझ कंट्रोल, व्हॉइस असिस्टंट आणि मॅजिक ट्विस्ट रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यांसारखे हाय-टेक फीचर्स आहेत.
-
परफॉर्मन्सच्या बाबतीत ही स्कूटर केवळ ३.९ सेकंदात ० ते ४० किमी प्रतितास असा वेग पकडते. कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर १६१ किमीपर्यंतची रेंज देऊ शकते. विशेष म्हणजे, एथर एनर्जी या स्कूटरच्या बॅटरीवर तब्बल ८ वर्षांची वॉरंटी देत आहे.
-
ओला एस१ एक्स प्लस – जेन ३ (Ola S1 X+) : पहिल्यांदाच ई-स्कूटर खरेदी करणाऱ्यांसाठी ओलाची ही ‘जेन ३’ आवृत्ती एक चांगला पर्याय आहे. सुमारे १.३० लाख रुपये एक्स-शोरूम किंमत असलेल्या या स्कूटरमध्ये ५.२ kWh चा मोठा बॅटरी पॅक मिळतो, जो तब्बल ३२० किमीची जबरदस्त रेंज देतो असा कंपनीचा दावा आहे.
-
या स्कूटरमध्ये भारतात तयार झालेल्या ‘४६८० भारत सेल्स’चा वापर करण्यात आला आहे. याशिवाय मिड-ड्राइव्ह मोटर, ब्रेक-बाय-वायर तंत्रज्ञान, फ्रंट डिस्क ब्रेक्स, लेटेस्ट ‘MoveOS 5’ सॉफ्टवेअर, स्मार्टवॉच इंटिग्रेशन आणि इमर्जन्सी एसओएस यांसारखे सुरक्षेचे फीचर्स यात मिळतात.
-
टीव्हीएस आयक्यूब (TVS iQube) : भारतात सर्वाधिक विकली जाणारी ही इलेक्ट्रिक स्कूटर वेगवेगळ्या बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध असून, याची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत अंदाजे ९४,९९९ रुपये आहे. ही स्कूटर पारंपरिक लूक आणि आधुनिक फीचर्सचे उत्तम मिश्रण आहे, ज्यामध्ये व्हेरियंटनुसार २१२ किमीपर्यंतची रेंज मिळते.
-
टीव्हीएस आयक्यूबमध्ये फुल एलईडी लाइटिंग, टीएफटी डिस्प्ले, ‘SmartXonnect’ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन, राइड मोड्स आणि पार्किंग असिस्ट हे फीचर्स मिळतात. तसेच, यात ३२ लीटरची मोठी डिकी दिली असल्याने ती दैनंदिन वापरासाठी अतिशय सोयीची ठरते.
-
एथर रिझ्टा (Ather Rizta) : एथरची ही दुसरी स्कूटर सध्याच्या नवीन पिढीच्या खरेदीदारांमध्ये कमालीची लोकप्रिय होत आहे. सुमारे १.१७ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत येणारी ही स्कूटर १५९ किमीपर्यंतची रेंज देते. या मॉडेलवरही कंपनी तब्बल ८ वर्षांची बॅटरी वॉरंटी ग्राहकांना देत आहे.
-
यात तुम्हाला ५६ लीटरची अवाढव्य स्टोरेज स्पेस मिळते. तंत्रज्ञानाचा विचार केला तर यात टीएफटी डिस्प्ले, ऑटो होल्ड, स्किड कंट्रोल, हिल असिस्ट, रिव्हर्स मोड, थेफ्ट प्रोटेक्शन आणि लाईव लोकेशन शेअरींग यांसारखे एकापेक्षा एक भारी फीचर्स मिळतात.
-
इलेक्ट्रिक स्कूटर घेताना आपला रोजचा प्रवास किती किलोमीटरचा आहे? हे लक्षात घेणेही आवश्यक आहे. दिवसाला किमान ४० किमीपेक्षा जास्त अंतर असेल तर ईव्हीची किंमत वसूल होण्यास मदत होते. कारण, प्रत्येक ईव्हीला ५ ते ८ वर्षांपर्यंत बॅटरीची वॉरंटी येते.