-
युबारी किंग टरबूज (Yubari King Melon) जपान : हे जगात मिळणारे सर्वात महागडे फळ आहे. जपानच्या होक्काइडो बेटावर हे टरबूज पिकवले जाते. हे फळ अतिशय गोड आणि दिसायला पूर्णपणे गोल असते. आंतरराष्ट्रीय लिलावात दोन युबारी टरबुजांची जोडी तब्बल ३० ते ३५ लाख रुपयांना विकली गेली आहे. साधारणपणे या फळाला ४००० ते १७,००० रुपयांचा भाव मिळतो. जपानमध्ये हे फळ प्रतिष्ठित व्यक्तींना भेट म्हणून देण्याची परंपरा आहे. (Canva)
-
रुबी रोमन द्राक्षे (Ruby Roman Grapes) – जपान : जपानच्या इशिकावा प्रांतात मिळणारे हे द्राक्ष एका मोठ्या लाल रंगाच्या गोटीच्या आकाराचे असते. या द्राक्षाचा एक घड साधारण ८ ते ९ लाख रुपयांना विकला जातो. विशेष म्हणजे याच्या एका घडामध्ये केवळ २४ ते ३० द्राक्षे असतात, म्हणजेच एका एका द्राक्षाची किंमत तब्बल ३० ते ३५ हजार रुपये असते. (Canva)
-
मियाझाकी आंबा (Miyazaki Mango) – जपान : ‘एग ऑफ द सन’ म्हणून ओळखला जाणारा हा आंबा त्याच्या गडद लाल रंगासाठी आणि अप्रतिम गोडीसाठी प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याची किंमत २.५ ते ३ लाख रुपये प्रति किलो आहे. नुकतेच अयोध्येतील एका शेतकऱ्याने हे फळ आपल्या बागेत यशस्वीपणे पिकवून प्रभू श्रीरामाला अर्पण केले होते, ज्यामुळे याची भारतात मोठी चर्चा झाली. (Canva)
-
डेंसुके टरबूज (Densuke Watermelon) – जपान : हे टरबूज आपल्या नेहमीच्या टरबुजासारखे हिरवे नसून पूर्णपणे काळ्या रंगाचे असते आणि यावर कोणतेही पट्टे नसतात. हे टरबूज अत्यंत दुर्मिळ असून वर्षाला याचे उत्पादन केवळ १०० ते २०० नगच होते. लिलावात या एका काळ्या टरबुजाची किंमत ४ ते ४.५ लाख रुपयांपर्यंत जाते. (Canva)
-
चौकोनी टरबूज (Square Watermelon) – जपान : सामान्यतः टरबूज गोल किंवा लंबगोल असते, पण जपानमधील शेतकरी विशेष प्लास्टिकच्या बॉक्सचा वापर करून टरबुजाला ‘चौकोनी’ आकार देतात. हे टरबूज फ्रिजमध्ये ठेवणे आणि कापून वाहतूक करणे सोपे जाते. या एका चौकोनी टरबुजाची किंमत सुमारे ६० ते ८० हजार रुपये असते. (Canva)
-
सेकाई इची सफरचंद (Sekai-Ichi Apple) – जपान : ‘सेकाई इची’ या शब्दाचा अर्थ ‘जगातील सर्वोत्तम’ असा होतो. या सफरचंदाचे वजन जवळपास १ किलोपर्यंत असू शकते. हे सफरचंद पिकवताना त्याला मध लावून हाताने पॉलिश केले जाते, जेणेकरून त्याला डाग पडणार नाही. या एकाच सफरचंदाची किंमत १,५०० ते २,००० रुपये एवढी असते. (Canva)
-
सेम्बिकिया स्ट्रॉबेरी (Sembikiya Queen Strawberry) – जपान : या दिसायला अत्यंत सुंदर आणि लाल चुटुक स्ट्रॉबेरी असतात. याच्या एका बॉक्समध्ये १२ स्ट्रॉबेरी असतात, ज्यांची किंमत सुमारे ६ ते ७ हजार रुपये असते. या सर्व स्ट्रॉबेरी एकाच आकाराच्या आणि वजनाच्या असतील यासाठी विशेष काळजी घेतली जाते. (Canva)
-
डेकोपोन सायट्रस (Dekopon Citrus) – जपान : हा संत्र्याचा एक विशेष प्रकार आहे, जो जगातील सर्वात चविष्ट संत्रा मानला जातो. या संत्र्याच्या वरच्या भागावर एक छोटासा उंचवटा असतो. हा संत्रा पूर्णपणे बिया नसलेला आणि अत्यंत रसाळ असतो. याच्या ६ नग असलेल्या एका बॉक्सची किंमत साधारण ६ ते ७ हजार रुपये असते. (Canva)
-
व्हाईट ज्युवेल स्ट्रॉबेरी (White Jewel Strawberry) – जपान : या स्ट्रॉबेरीचा रंग लाल नसून पूर्णपणे पांढरा असतो आणि त्यावर लाल बिया असतात. सूर्यप्रकाशापासून वाचवून एका विशेष अंधाऱ्या खोलीत या पिकवल्या जातात. या एकाच पांढऱ्या स्ट्रॉबेरीची किंमत सुमारे ८०० ते १,००० रुपये असते. (Canva)
-
हेल Lost Gardens of Heligan अननस – ब्रिटन : या यादीतील जपानबाहेरील एकमेव फळ म्हणजे ब्रिटनचे हे अननस. इंग्लंडमधील कॉर्नवॉल येथे अत्यंत थंड वातावरणात ग्रीनहाऊस आणि घोड्याचे खत वापरून हे अननस पिकवले जाते. हे अननस तयार होण्यासाठी २ वर्षांचा काळ लागतो. या एका अननसाची किंमत १ ते १.५ लाख रुपये एवढी आहे. जपानमध्ये भेटवस्तू देण्याची मोठी परंपरा आहे. यामध्ये फळांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. (Canva)
-
अलीकडेच जगातील सर्वात महागडा मानला जाणारा जपानी ‘मियाझाकी’ आंबा अयोध्येतील एका प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या बागेत यशस्वीपणे पिकवला आहे. या आंब्याचे बागेतील पहिले फळ शेतकऱ्याने प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण केले आहे.