-
मारुती सुझुकी एस-प्रेसो : तुम्ही महागड्या दुचाकीच्या किमतीत ही कार सहज घरी आणू शकता. या कारची एक्स शो रूम किंमत ३.५० लाखांपासून सुरू होते. हिचे मायलेज आणि कमी देखभालीचा खर्च मध्यमवर्गीयांना खूप परवडतो. (Indian Express)
-
मारुती सुझुकी अल्टो K10 : नव्या दमाची अल्टो K10 अधिक शक्तिशाली इंजिन आणि आधुनिक फीचर्ससह येते. हिची किंमत अंदाजे ४.३१ लाख ते ६.३२ लाख रुपयांपर्यंत आहे. शहरात गर्दीच्यावेळी चालवण्यासाठी या कारइतका चांगला पर्याय नाही. (Indian Express)
-
रेनॉल्ट क्विड : दिसायला अत्यंत आकर्षक आणि स्पोर्टी लुक असलेली ‘रेनॉल्ट क्विड’ ही या बजेटमधील एक लोकप्रिय कार आहे. हिची किंमत ४.३० लाख ते ५.९९ लाख रुपयांच्या घरात आहे. बजेट कार असूनही हिचे इंटिरिअर आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम ग्राहकांना आकर्षित करते. (Indian Express)
-
टाटा टियागो : जर तुमच्यासाठी कुटुंबाची सुरक्षा सर्वात महत्त्वाची असेल, तर ‘टाटा टियागो’ हा सर्वोत्तम पर्याय आहे. मजबूत बिल्ड कॉलिटी आणि उत्तम सेफ्टी रेटिंग असलेली ही कार ४.६९ लाखांपासून सुरू होते. (Indian Express)
-
मारुती सुझुकी सेलेरियो : उत्तम मायलेज आणि प्रीमियम लूक हवा असेल तर ‘सेलेरियो’ चांगला पर्याय आहे. या कारची किंमत अंदाजे ४.७० लाख ते ६.७३ लाख रुपये आहे. हिची केबिन स्पेस उत्तम असून प्रवाशांसाठी ही कार अतिशय आरामदायी ठरते. (Indian Express)
-
या पाचही कार्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे मायलेज. मारुती आणि रेनॉल्टच्या कार्स पेट्रोलवर साधारणपणे २० ते २५ किमी प्रतिलीटरपर्यंतचे मायलेज सहज देतात, ज्यामुळे दैनंदिन प्रवासाचा खर्च कमालीचा कमी होतो. (Indian Express)
-
अल्टो K10, क्विड आणि एस-प्रेसो या कार्स आकाराने कॉम्पॅक्ट आहेत. त्यामुळे मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमधील ट्रॅफिकमधून गाडी काढणे आणि छोट्या जागेत पार्क करणे अतिशय सोपे जाते. (Canva)
-
पेट्रोलच्या वाढत्या किमतीची तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण, मारुती सेलेरियो, अल्टो K10, एस-प्रेसो आणि टाटा टियागो या कार्स कंपन्यांनी सीएनजी व्हेरियंटमध्येही आणल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना अधिक बचतीचा पर्याय मिळतो. (Indian Express)
-
मारुती सुझुकी आणि टाटा या ब्रँड्सचे सर्व्हिस नेटवर्क अगदी ग्रामीण भागातही मजबूत आहे. तसेच, मारुतीच्या गाड्यांना भविष्यात विक्रीसाठी चांगली ‘री-सेल व्हॅल्यू’ मिळते, ज्यामुळे ग्राहकांचे पैसे वाया जात नाहीत. (Canva)
आवडती अभिनेत्री कोण? प्रश्न विचारताच तुकाराम मुंढे हसले आणि म्हणाले; “मी..”