-
भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना आपल्याला नेहमी दोन नावे ऐकायला मिळतात BSE (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) आणि NSE (नॅशनल स्टॉक एक्सचेंज). हे दोन्ही भारताचे मुख्य शेअर बाजार आहेत, जिथे शेअर्सची खरेदी-विक्री होते. अनेकांना या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे असा प्रश्न पडतो. (संग्रहित छायाचित्र)
-
बीएसई हे भारतातील आणि संपूर्ण आशियातील सर्वात जुना शेअर बाजार आहे. याची स्थापना १८७५ मध्ये झाली. तर एनएसई हे तुलनेने नवीन आणि आधुनिक आहे. याची स्थापना १९९२ मध्ये झाली असून प्रत्यक्ष कामकाज १९९४ पासून सुरू झाले. (Reuters)
-
BSE चा मुख्य निर्देशांक S&P BSE SENSEX (सेन्सेक्स) आहे. यात देशातील टॉप ३० मोठ्या कंपन्यांचा समावेश होतो. तर NSE चा मुख्य निर्देशांक NIFTY 50 (निफ्टी) आहे. यात विविध क्षेत्रांतील टॉप ५० आघाडीच्या कंपन्यांचा समावेश होतो. (Reuters)
-
बीएसईत ५,३०० पेक्षा जास्त कंपन्या सूचिबद्ध आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांना निवडीसाठी मोठा वाव मिळतो. तर एनएसईमध्ये २,१०० पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत. (Reuters)
-
NSE च्या तुलनेत येथे रोज होणारी शेअर्सची एकूण खरेदी-विक्री कमी असते. NSE मध्ये रोजचा ट्रेडिंग व्हॉल्युम खूप जास्त असतो. भारताच्या बहुतांश एकूण उलाढालीचा वाटा NSE कडे आहे. (AI)
-
ट्रेडिंग व्हॉल्युम कमी असल्यामुळे BSE मध्ये तरलता थोडी कमी असते (शेअर्स त्वरित विकणे कधीकधी कठीण होऊ शकते). जास्त व्हॉल्युममुळे NSE मध्ये लिक्विडिटीचा प्रश्न नाही. शेअर्स काही सेकंदात सहज खरेदी किंवा विक्री करता येतात. (Indian Express)
-
जे गुंतवणूकदार दीर्घकाळासाठी शेअर्स घेऊन ठेवतात, त्यांच्यासाठी BSE उत्तम मानले जाते. जे रोजच्या रोज व्यापार करतात त्यांच्यासाठी NSE हा पहिला पसंतीचा पर्याय आहे. (Canva)
-
वायदा बाजार आणि F&O मधील व्यवहारांचे प्रमाण NSE च्या तुलनेत बीएसईमध्ये खूप कमी आहे. फ्युचर्स आणि ऑप्शन्स क्षेत्रात NSE ची एकप्रकारे मक्तेदारी आहे. बहुतांश ट्रेडर्स इथेच व्यापार करतात. (संग्रहित छायाचित्र)
-
BSE ही स्वतः शेअर बाजारात सूचिबद्ध कंपनी आहे. तुम्ही BSE चे शेअर्स खरेदी करू शकता. NSE देखील लवकरच बाजारात सूचिबद्ध होणार आहे. यासंदर्भात सेबीकडे कागदपत्रे जमा केली आहेत. (Indian Express)
-
जुन्या इतिहासामुळे आणि सर्वाधिक लिस्टेड कंपन्यांमुळे जागतिक स्तरावर BSE ला एक वेगळी प्रतिष्ठा आहे. जगातील सर्वात मोठ्या डेरिव्हेटिव्ह एक्सचेंजेसमध्ये NSE चा वरचा क्रमांक लागतो. (Canva)
‘मी आयएएसमधून निवृत्त होईन, सार्वजनिक सेवेतून नाही!’, तुकाराम मुंढेंच्या विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा