-
विवाहानंतर भारतीय संस्कृतीनुसार अनेक विधी आणि परंपरा पाळल्या जातात. पण, बदलत्या काळानुसार, आयुष्याची नवीन सुरुवात करताना भावनिक जोडणीसोबतच आर्थिक स्थिरता निर्माण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. प्रत्येक जोडप्याने लग्नानंतर ‘हे’ ५ आर्थिक नियम पाळले तर आयुष्याची गाडी नक्कीच सुस्साट धावेल.
-
संयुक्त गुंतवणूक : सर्वप्रथम दोघांनीही आपापली सध्याची गुंतवणूक, कर्जे (मागील एज्युकेशन लोन, पर्सनल लोन इ.) आणि उत्पन्नाची माहिती एकमेकांशी उघडपणे शेअर करावी.
-
मिळून येणाऱ्या उत्पन्नाचे वर्गीकरण करुन ५०% भाग आवश्यक खर्चांसाठी (घरखर्च, ईएमआय), ३०% वैयक्तिक इच्छेसाठी आणि २०% भविष्यातील गुंतवणुकीसाठी वापरा. घर खरेदी करणे, गाडी घेणे, वर्षातून एकदा ट्रिपला जाणे किंवा मुलांचे भविष्य व रिटायरमेंट प्लॅनिंग यांसारख्या ध्येयांची यादी तयार करा.
-
आणीबाणीचा निधी : सध्याच्या अनिश्चित काळात कधी मोठं आर्थिक संकट येईल सांगता येत नाही. अशा परिस्थितीत इमर्जन्सी फंड नसणे म्हणजे लाईफ जॅकेटशिवाय पाण्यात उडी मारण्यासारखे आहे. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात, त्यामुळे अचानक उद्भवणारे वैद्यकीय खर्च किंवा नोकरी गेल्यानंतर हा निधी मदतीला येतो.
-
६ ते १२ महिन्यांचा खर्च इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला ठेवावा. हे पैसे गरजेच्या वेळी लगेच काढता येईल अशा ठिकाणी (जसे की हाय-यिल्ड सेव्हिंग्स अकाउंट किंवा लिक्विड म्युच्युअल फंड) ठेवावा.
-
बँक खाती आणि नॉमिनेशन : लग्नानंतर कायदेशीर आणि प्रशासकीय कामांची पूर्तता करणे हा आर्थिक सुरक्षिततेचा महत्त्वाचा भाग आहे. घरखर्च आणि सामायिक गुंतवणुकीसाठी एक जॉइंट बँक खाते सुरू करा. या खात्यात दोघेही दरमहा ठराविक रक्कम जमा करू शकतात, ज्यातून घराचे मुख्य खर्च भागवले जातील. तुमच्या सर्व विद्यमान बँक खात्यांमध्ये, डिमॅट अकाउंट्स, एफडी, पीएफ आणि म्युच्युअल फंड्समध्ये पती/पत्नीचे नाव नॉमिनी म्हणून अपडेट करायला विसरू नका.
-
योग्य विमा : वैद्यकीय खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशावेळी एखादे दुखणं तुमच्या वर्षाची कमाई खाऊ शकतो. कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य इन्शुरन्स कव्हर असणे ही काळाजी गरज बनली आहे.
-
दोघापैकी एक कमावता असेल किंवा दोघेही कमावते असाल तरीही दोघांचाही टर्म इन्शुरन्स आवश्यक आहे. तो उत्पन्नाच्या किमान १० ते १५ पट रकमेचा असाव. यामुळे दुर्दैवी घटनेच्या वेळी पाठीमागे राहणाऱ्या जोडीदाराला आर्थिक आधार मिळतो. तसेच वैयक्तिक हेल्थ प्लॅन ऐवजी फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्समध्ये शिफ्ट व्हा. यामध्ये पती-पत्नी दोघांना एकाच पॉलिसीमध्ये मोठे कव्हर मिळते आणि प्रीमियमचा खर्चही नियंत्रित राहतो.
-
करांचे नियोजन : दोन उत्पन्नस्रोत एकत्र आल्यामुळे योग्य टॅक्स प्लॅनिंग करून कर बचत करणे आणि पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करणे शक्य होते. इन्कम टॅक्स ॲक्टच्या कलम 80C, 80D इत्यादींचा वापर करून दोघांच्या उत्पन्नावर जास्तीत जास्त कर कसा वाचवता येईल याचे नियोजन करा. (सर्व छायाचित्र – कॅन्वा)
आजपासून ‘या’ ५ राशींचा सुवर्णकाळ सुरू! बुधाच्या एका बदलाने पैसा, यश अन् भरभराट येणार दारी; तिजोरीत वाढेल धनसंपत्ती