-
स्मार्टफोनच्या बाजारात फोल्डेबल फोन्स आपलं स्थान वेगानं पक्कं करत असल्याचे दिसत आहे. इतकी वर्ष फोल्डेबल फोनपासून दूर राहिलेल्या ॲपलने अखेर ९ सप्टेंबर रोजी आयोजित विशेष ‘सरप्राईज अँड शाईन’ इव्हेंटमध्ये कंपनीने आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन ‘आयफोन ड्युओ’ (iPhone Duo) सादर केला.
-
क्लेमशेल (Clamshell) आणि बुक-स्टाईल (Book-style) अशा दोन प्रमुख प्रकारांमध्ये उपलब्ध असलेल्या फोल्डेबल फोन्सच्या किमतींमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे
-
सध्या फोल्डेबल प्रकारात सर्वात स्वस्त स्मार्टफोन मोटोरोला कंपनी विकते. कंपनीचा मोटोरोला रेझर ६० अल्ट्रा ७९,९९९ रुपयांत उपलब्ध आहे. १ लाख रुपयांच्या आतमध्ये येणारा हा एकमेव फोल्डेबल फोन आहे.
-
वीवो कंपनीचा vivo X Fold5 हा फोल्डेबल फोन बुक-स्टाईल प्रकारातील असून त्याची किंमत तब्बल १,३९,९९९ रुपये आहे.
-
फोल्डेबल फोन प्रकारात गुगलचा Google Pixel 10 Pro Fold फोनही प्रसिद्ध आहे. बुक-स्टाईल प्रकारतील या फोनसाठी तुम्हाला १ लाख ७२ हजार ९९९ रुपये मोजावे लागतील.
-
सॅमसंग ही फोल्डेबल फोन प्रकारातील आघाडीची कंपनी आहे, कंपनीचा Samsung Galaxy Z Fold7 हा फ्लॅगशीप फोन १ लाख ७४ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळत आहे.
-
दुसरीकडे, प्रीमियम बुक-स्टाईल सेगमेंटमध्ये Google Pixel 10 Pro Fold आणि Samsung Galaxy Z Fold7 यांच्यात टक्कर आहे. या संपूर्ण बाजारात Apples iphone Duo हा २,९९,९०० या सुरुवातीच्या किमतीसह सर्वात महागडा आणि लक्झरी श्रेणीतील फोल्डेबल फोन ठरत आहे.
-
दुसरीकडे, प्रीमियम बुक-स्टाईल सेगमेंटमध्ये Google Pixel 10 Pro Fold आणि Samsung Galaxy Z Fold7 यांच्यात टक्कर आहे. या संपूर्ण बाजारात Apples iphone Duo हा २,९९,९०० या सुरुवातीच्या किमतीसह सर्वात महागडा आणि लक्झरी श्रेणीतील फोल्डेबल फोन ठरत आहे.
Nana Patekar’s Last Video: नाना पाटेकर निधनापूर्वी गोव्यात ज्या ‘शामेल’ अन् ‘देखणी’त रंगले; काय आहे त्यांचा शेकडो वर्षांचा इतिहास?