‘कोहली ब्रिगेड’चे ट्रेकिंग..
- 1 / 7
पुण्यात खेळविण्यात आलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीत भारतीय संघाला ३३३ धावांच्या मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची निराशा दूर करण्यासाठी 'कोहली ब्रिगेड'ने पुण्यात ट्रेकिंगचा आनंद लुटला. (इंस्टाग्राम)
- 2 / 7
पुण्यापासून ८० किमी अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटात कोहलीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने ट्रेकिंग केले.
- 3 / 7
दमदार फॉर्मात असूनही कर्णधार कोहलीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत संघाला विजयश्री मिळवून देता आली नाही. कोहलीने दोन डावात केवळ १३ धावा केल्या. पराभवामुळे निराश न होता नव्या दमाने पुढच्या कसोटीला सामोरे जाण्याआधी कोहलीने ट्रेकिंगचा थरारक अनुभव घेतला. (छाया- फेसबुक)
- 4 / 7
भारतीय संघाच्या मधल्या फळीचा शिलेदार अजिंक्य रहाणे आपल्या पत्नीसोबत ट्रेकवर आला होता.
- 5 / 7
ट्रेकिंगनंतर राष्ट्रध्वज फडकावताना भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजा. पुण्याच्या ताम्हिणी घाटात भारतीय संघाने ट्रेकिंगचा आनंद लुटला. (छाया- इंस्टाग्राम)
- 6 / 7
भारतीय फिरकीपूट रविचंद्रन अश्विनने यावेळी युवा फलंदाज अभिनव मुकूंदसोबत टीपलेला सेल्फी. (इंस्टाग्राम)
- 7 / 7
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत चांगला सुर गवसल्याचे पाहायला मिळाले होते. यादवने आपल्या पत्नीसोबत तान्यासोबत ट्रेकिंगचा अनुभव घेतला.