-
आगामी लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाबचं स्थान अधिक बळकट असणार आहे. महत्वाच्या खेळाडूंना करारमुक्त केल्यानंतर पंजाब यंदा अधिक उमद्या खेळाडूंना संघात स्थान देण्याच्या विचारात असेल.
-
चेन्नईने आपल्या संघातून ५ खेळाडूंना करारमुक्त केलंय. चेन्नई आगामी हंगामात २ परदेशी खेळाडूंना घेऊ शकणार आहे, त्यामुळे या लिलावात चेन्नई कोणत्या खेळाडूला संघात जागा देतंय हे पहावं लागणार आहे.
-
अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन आश्विन यांच्या येण्यानंतर दिल्लीचा संघ अधिक बलवान झालाय. १२७ कोटींपेक्षा अधिक रकमेसह दिल्ली आगामी हंगामात कोणत्या खेळाडूंना पसंती देईल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
-
पंजाबपाठोपाठ कोलकात्यानेही योग्य रणनिती आखत आपल्या संघातील खेळाडूंना करारमुक्त केलंय. आगामी लिलावात कोलकात्याच्या खात्यातही पुष्कळशी रक्कम असणार आहे.
-
गतविजेत्या मुंबईने यंदा खेळाडूंची देवाण-घेवाण जास्त केली आहे. सध्या मुंबईकडे २ परदेशी खेळाडूंची जागा रिक्त आहे.
-
विराट कोहलीच्या बंगळुरु संघाला आतापर्यंत एकदाही यश मिळवता आलं नाहीये. त्यामुळे आगामी लिलावात RCB कोणत्या खेळाडूची निवड करतं याकडे सर्वांचं लक्ष असेल.
-
अजिंक्य रहाणेला दिल्ली संघाकडे दिल्यानंतर राजस्थानने स्टिव्ह स्मिथकडे नेतृत्व दिलं आहे. त्यामुळे आगामी हंगामात स्मिथच्या नेतृत्वाखाली राजस्थानचा संघ कुठपर्यंत मजल मारतो हे पहावं लागणार आहे.
-
हैदराबादने यंदा सावध पवित्रा घेत शाकीब,, युसूफ पठाण यांना करारमुक्त केलंय.

२८ मार्च राशिभविष्य: शुक्ल योगात १२ राशींचा दिवस कसा जाणार? कोणाला करावे लागेल कामाचे योग्य नियोजन, तर कोणाला पाहावी लागेल योग्य संधीची वाट