निवृत्तीनंतर पहिल्यांदाच दिसला धोनी; तरूणांना लाजवेल असा ‘कॅप्टन कूल’चा फिटनेस
- 1 / 15
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.
- 2 / 15
२०१९च्या विश्वचषकानंतर धोनी स्पर्धात्मक क्रिकेटपासून लांब होता. ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकासाठी त्याची निवड होईल की नाही याबाबत चर्चा रंगल्या होत्या.
- 3 / 15
निवृत्ती आणि पुनरागमन यापैकी धोनीने निवृत्तीची निवड केली आणि अनपेक्षितपणे १५ ऑगस्टला संध्याकाळी घोषणा करून टाकली.
- 4 / 15
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला धोनीने रामराम ठोकला असला तरी IPLच्या यंदाच्या हंगामात तो खेळणार आहे हे नक्की.
- 5 / 15
IPLच्या आयोजनावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर धोनीने रांचीच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बॉलिंगच्या मशिनच्या मदतीने फलंदाजीचा दमदार सराव केला होता.
- 6 / 15
युएईला जाणाऱ्या CSKच्या संघासोबत नुकताच धोनी दिसून आला. निवृत्ती जाहीर केल्यानंतर प्रथमच धोनीची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली.
- 7 / 15
- 8 / 15
निवृत्तीचा निर्णय धोनीने घेतला असला तरी विशीतल्या तरूणांना लाजवेल असा त्याचा फिटनेस फोटो आणि व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून आला.
- 9 / 15
धोनीसोबतच धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना, अष्टपैलू रविंद्र जाडेजा, केदार जाधव आणि इतरही काही महत्त्वाचे खेळाडूही नेट्समध्ये सराव करताना दिसले.
- 10 / 15
चेन्नईमध्ये दाखल झालेल्या धोनीनेदेखील नेट्समध्ये सराव केला.
- 11 / 15
एम.एस.धोनी (कर्णधार)
- 12 / 15
केवळ फलंदाजीच नव्हे, तर गोलंदाजीचे धडे गिरवणारा धोनीदेखील अनेकांना यावेळी पाहायला मिळाला.
- 13 / 15
लवकरच सर्व संघ IPL 2020साठी युएईला उड्डाण करणार आहेत. सर्व खेळाडू आपल्या बॅगा भरून तयार आहेत.
- 14 / 15
BCCI ने करोनासंदर्भातील नियम पाळायला सांगितल्याची ताकीद दिल्याने चेन्नईच्या खेळाडूंनी सोशल डिन्स्टसिंगचे भान राखल्याचे दिसून आहे.
- 15 / 15
याशिवाय तोंडावर मास्क घालणे आणि इतर आवश्यक ती काळजी घेतानाही चेन्नईचे खेळाडू दिसले.