क्रिकेटची हत्या केली म्हणणाऱ्या भाजपा नेत्याला हनुमा विहारीचा भन्नाट रिप्लाय; सेहवागही झाला लोटपोट
- 1 / 15
बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनीतील तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राखून भारताने ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखल्यानंतर भाजपा नेत्याचं एक ट्विट चर्चेत आलं होतं. यामध्ये भाजपा नेत्याने हनुमा विहारीचा उल्लेख क्रिकेटची हत्या करणारा खेळाडू असा केला होता.
- 2 / 15
याच ट्विटला हनुमा विहारीने आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. बरं विशेष म्हणजे या उत्तरावर भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागनेही मजेदार कमेंट केलीय.
- 3 / 15
बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनीतील तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राखून भारताने ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखलं. ऋषभ पंत ९७ धावांवर बाद झाल्यानंतर हनुमा विहारी आणि अश्विनने संयमाने फलंदाजी केली व सामना अनिर्णीत ठोवण्यात यश मिळवलं. खरंतर या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय होईल असं मानलं जात होतं.
- 4 / 15
चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी आणि आर. अश्विनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना यश मिळू दिलं नाही.
- 5 / 15
हनुमा विहारीने १६१ चेंडू खेळून काढले. हनुमा आणि अश्विनने डावाची पडझड होणार नाही या दृष्टीने फलंदाजी करत किल्ला लढवला.
- 6 / 15
हनुमाच्या या कामगिरीचे क्रिकेटच्या जाणकारांडून कौतुक केलं. पण गायक, भाजपा नेता आणि खासदार बाबुल सुप्रियो यांनी मात्र विहारीच्या खेळावर टीका केली.
- 7 / 15
“फक्त सात धावा करण्यासाठी हनुमा विहारी १०९ चेंडू खेळला. हा अत्याचार आहे. हुनमा विहारीने भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या शक्यतेबरोबरच क्रिकेटची सुद्धा हत्या केली. कृपया नोंद घ्यावी मला क्रिकेटमधलं फारसं काही कळत नाही” असं ट्विट बाबुल सुप्रियो यांनी केलं होतं.
- 8 / 15
यावरुन बाबुल सुप्रियो सोशल नेटवर्किंगवर ट्रोलही झाले होते.
- 9 / 15
मात्र नेटकऱ्यांनी हल्लाबोल केल्यानंतर आता सुप्रियो यांच्या या ट्विटला थेट हुनमा विहारीने अगदी दोनच शब्दांचा पण हटके रिप्लाय दिला आहे. विहारीने सुप्रियो यांच्या ट्विटवर कमेंट करुन आपलं संपूर्ण नाव लिहिलं आहे.
- 10 / 15
सुप्रियो यांनी हनुमा विहारीवर टीका करताना त्याचं नाव चुकीचं लिहिलं होतं. हनुमा विहारी लिहिण्याऐवजी सुप्रियो यांनी हनुमा बिहारी असं लिहिलं होतं. हीच चूक हनुमाने सुधारली. म्हणजेच त्याने टीकेपेक्षा आपल्या नावाला अधिक महत्व असल्याचं अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे.
- 11 / 15
यावर सेहवागनेही गुगली टाकत हनुमाच्या कमेंटवर मजेदार रिप्लाय दिलाय.
- 12 / 15
कमेंटाचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत सेहवागने, "अपना विहारी सब पर भारी" असं म्हटलं आहे.
- 13 / 15
सेहवागच नाही तर अनेकांनी हनुमाच्या या रिप्लायचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत त्याच्या या स्ट्रेट ड्राइव्हसारख्या ट्विटसाठी त्याचं कौतुक केलं आहे.
- 14 / 15
सध्या हा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झालाय.
- 15 / 15
दरम्यान, भारताने तिसरी कसोटी अनिर्णित ठेवण्यात यश मिळवल्याने आता चौथ्या कसोटीच्या निकालावर मालिकेची भवितव्य ठरणार आहे. चौथी कसोटी १५ जानेवारीपासून सुरु होत आहे. (फोटो सौजन्य ट्विटरवरुन साभार)