-
टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताचं उपांत्य फेरीतचं स्वप्न भंगल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडलाय.
-
भारतीय क्रिकेट संघ उपांत्य फेरीसाठी अपात्र ठरल्यानंतर भारतीय संघ नेटकऱ्यांच्या रडारवर आलाय.
-
भारतीय क्रिकेट चाहते अनेक भन्नाट मीम्स पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त करत आहे.
-
सेलिब्रेटी देखील मीम्स टाकण्यात मागे नाही. भारतीय क्रिकेटर वसीम जाफरने देखील एक मीम टाकत भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानमधील उपांत्य फेरीतील चुरशीवर टोला लगावणारं मीम पोस्ट केलंय
-
विशेष म्हणजे या मीम्समध्ये मराठी मीम्सचंही प्रमाण मोठं आहे.
-
मराठी क्रिकेट चाहते देखील या सामन्याच्या निमित्ताने उपरोधिक टोले लगावत आहेत.
-
भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरच्या प्रतिक्रियेवरही मीम बनवण्यात आलंय.
-
न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतीय संघाला मुंबई विमानतळावर परण्याशिवाय पर्याय नाही अशा आशयाचं मीमही शेअर केलं जातंय.
-
अफगाणिस्तानच्या विकेट जात असताना भारतीय क्रिकेट चाहत्यांनाही वाईट होतं. त्यामुळे त्यावरही मीम्समधून निशाणा साधण्यात आला.
-
या सामन्याच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट चाहते अफगाणिस्तानच्या संघाला पाठिंबा देताना दिसल्यानं त्यावरही मीम पोस्ट करण्यात आलंय.
