-
गोल्फला श्रीमंतांचा खेळ म्हटले जाते. कारण या खेळाच्या मैदानापासून ते किटपर्यंत सर्व काही महाग आहे. हा खेळ मध्यमवर्गीय किंवा निम्नवर्गीय लोकांना परवडणारा नाही. सहसा तुम्ही या गेममध्ये ट्राउझर्स आणि पोलो टी-शर्ट घातलेले लोक पाहिले असतील, परंतु आजकाल एका महिलेबद्दल खूप चर्चा आहे जी गोल्फर आहे. परंतु तिचा पोशाख पूर्णपणे वेगळा आहे. ती खूप बोल्ड कपड्यांमध्ये मैदानावर दिसत आहे, त्यामुळे सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.
-
२८ वर्षीय अमेरिकन गोल्फर पेज स्प्रिनेक (Paige Spiranac) ही तिच्या खेळासाठी कमी आणि कपड्यांसाठी, दिसण्यासाठी अधिक ओळखली जाते. ती अजूनही सिंगल आहे.
-
स्प्रिनेक जगातील सर्वात हॉट गोल्फर मानली जातो. तिचे इन्स्टाग्रामवर ३.२ मिलियनपेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत.
-
स्प्रिनेक अनेक बड्या स्टार्सपेक्षा वरचढ आहे. ती इन्स्टाग्रामवर तिचे हॉट फोटो पोस्ट करत असते.
-
एका मुलाखतीत स्प्रिनेकने सांगितले, की इन्स्टाग्रामवर टाकत असलेल्या फोटोंमुळे तिला सतत लक्ष्य केले जाते. ज्युनियर गोल्फमध्ये असतानाही तिच्या शॉर्ट स्कर्टबद्दल अशा गोष्टी बोलल्या जायच्या.
-
स्प्रिनेक म्हणाली, ”मी सेक्सी आहे, मला माझ्या शरीरावर प्रेम आहे आणि हीच खरी मी आहे. मला नेहमी सारखे कपडे घालायला आवडतात. माझे कपडे पाहून लोक मला स्ट्रिपर म्हणतात किंवा माझी तुलना पॉर्न स्टारशी करतात.”
-
स्प्रिनेकने २०१५ पासून व्यावसायिक गोल्फ खेळण्यास सुरुवात केली. २०१६ डिसेंबरमध्ये तिने व्यावसायिक गोल्फमधून निवृत्ती घेतली, तरीही ती गोल्फ मैदानावर खेळताना व्हिडिओ शेअर करत राहते. स्प्रिनेकला तिच्या कपड्यांबद्दल जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या आहेत.

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक