-
देशात सध्या कर्नाटकातील महाविद्यालयात करण्यात आलेल्या हिजाब बंदीवरून वातावरण तापलं आहे. हिजाब समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलने देखील करण्यात येत आहेत.
-
काही जण हिजाब बंदीला समर्थन तर काही विरोध दर्शवत आहेत. असं असलं तरी आपल्या धर्माबद्दल अतोनात प्रेम आणि आदर असणाऱ्या व्यक्तीही या समाजात आहेत.
-
एकीकडे हिजाब परिधान केल्यामुळे मुलींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला जातोय. मात्र, दुसरीकडे अशीही क्रिकेटर आहे जिने हिजाब परिधान करत क्रिकेटचं मैदान गाजवलं आहे. तिचं नाव आहे अबताहा मकसूद.
-
‘द हंड्रेड’ या क्रिकेटच्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेमध्ये अबताह मकसूद सहभगी झाली होती.
-
जुलै २०२१ मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेदरम्यान हिजाब घालून अबताहा क्रिकेटच्या मैदानात उतरलेली.
-
आपल्या या कृतीने अबताहा मकसूदने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं.
-
अबताहाच्या या कृतीचं कौतुक देखील झालं, तर काहींनी तिच्यावर टीका केली होती.
-
मात्र तिने या कृतीमधून एक आदर्शही निर्माण केल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली.
-
अबताहा मकसूद ही २२ वर्षीय स्कॉटीश महिला क्रिकेटर आहे. तिचा जन्म ११ जून १९९९ रोजी युनायटेड किंग्डम मधील ग्लासगो शहरात झाला.
-
ब्रिटिश नागरिकत्व असलेली अबताहा मकसूद ही मूळची पाकिस्तानी असून इस्लाम धर्माचं पालन करते.
-
अबताहाला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. ११ वर्षांची असल्यापासून ती क्रिकेट खेळते.
-
स्कॉटलँड या देशाकडून क्रिकेट खेळणारी अबताहा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे.
-
२०१७ मध्ये झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत अबताहा स्कॉटलँडच्या महिला क्रिकेट टीमकडून खेळली होती.
-
क्रिकेटप्रेमी अबताहाने तायक्वांदो या खेळाचे प्रशिक्षणही घेतलेलं आहे. तायक्वांदो या खेळ प्रकारातील ब्लॅक बेल्ट तिच्याकडे आहे.
-
२०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेममध्ये तिने देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं.
-
एका मुलाखतीदरम्यान अबताहा मकसूदने हिजाब घालून मैदानात उतरल्याचं कारण सांगितलं होतं.
-
“मी कोणत्याही महिला मुस्लिम खेळाडूला हिजाब परिधान करून खेळताना पाहिलेलं नाही. मला हिजाब घालून खेळताना पाहून अनेक मुस्लिम महिलांना धीर येईल आणि प्रेरणा मिळेल.”, असं ती म्हणाली होती.
-
(सर्व फोटो : अबताहा मकसूद/ इन्स्टाग्राम)

“Infosys एक भयानक पद्धत रूढ करत आहे”, मोठ्या कर्मचारी कपातीवर NITES ची केंद्र सरकारकडे तक्रार!