
इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2022) १५ व्या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात झाली आहे. (फोटो:Indian Express)

करोनामुळे ग्रुप स्टेजचे सगळे सामने मुंबई आणि पुण्यातच होणार आहेत. (फोटो:Indian Express)

मुंबईतील वानखेडे, ब्रेबोन आणि डी.वाय. पाटील स्टेडियमवर आणि पुण्यातील एमसीए स्टेडियमवर सामने होणार आहेत. मुंबईत एकूण ५५ तर पुण्यात १५ सामने होणार आहेत. (फोटो:Indian Express)

चेन्नई सुपर किंग्सचा संघ नरिमन पॉइंट येथील ट्रायडेंट या हॉटेलमध्ये राहत आहे.

लखनऊ सुपर जायंट्स पुढील दोन महिने ताज विवांता (ता प्रेसिडेंट हॉटेल) येथे राहत आहेत.

गुजरात टायटन्सचा संघ जेडब्ल्यू मॅरियट, सहारमध्ये राहत आहेत.

आयपीएल २०२२ साठी कोलकाता नाइट रायडर्सचा संघ ITC ग्रँड सेंट्रल या हॉटेलमध्ये राहत आहे.

मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ राहत आहे.

चार वेळा आयपीएल चॅम्पियन झालेला संघ, मुंबई इंडियन्स दक्षिण मुंबईतील सर्वात आलिशान हॉटेल्सपैकी एक असलेल्या ट्रायडंट बांद्रा कुर्ला येथे मुक्काम केला आहे.

पवई तलावाच्या काठावर सुबकपणे वसलेले, रेनेसान्स मुंबई कन्व्हेन्शन सेंटर हॉटेल पुढील तीन महिन्यांसाठी पंजाब किंग्जचे घर असेल.

राजस्थान ओव्हल्स ग्रँड हयात मुंबई येथे मुक्काम केला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ताज लँड्स एंड येथे मुक्काम केला आहे.

ITC मराठा हे पुढील दोन महिने सनरायझर्स हैदराबादचे घर असेल.

दरम्यान, पुण्यात खेळणाऱ्या संघ शहरातील जेडब्ल्यू मॅरियटमध्ये राहत आहेत.

जेडब्ल्यू मॅरियटसह पुण्यातील कॉनरॅड हॉटेलमध्येही काही संघ राहत आहेत. (सर्व फोटो: booking.com )