
इंडियन प्रिमियर लीगचा १५ वा हंगाम २६ मार्चपासून खेळवला जाणार आहे.

क्रिकेट सोबतच आयपीएलमध्ये अनेक रोमांचक आणि मनोरंजक गोष्टी घडत असतात.

कधी पॅव्हेलियनमधील अभिनेत्री चर्चेचा विषय बनतात तर कधी क्रिकेटप्रेंमीमधील चाहते कॅमेराचं लक्ष वेधून घेतात.

क्रिकेट संघांच्या मालकिण असलेल्या ग्लॅमरस महिलाही आयपीएल दरम्यान केंद्रबिंदू ठरल्या आहेत.

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी आयपीएलमधील राजस्थान रॉसल्स संघाचे ११.७ टक्के मालकी हक्क विकत घेतले होते.

राजस्थान रॉसल्स संघाला मॅच दरम्यान प्रोत्साहन देताना अनेकदा शिल्पा शेट्टी दिसून आली होती.

प्रसिध्द अभिनेत्री जुही चावला कोलकाता नाईट रायडर्स संघांची सह मालकिण आहे.

अनेकदा टीमला चीअर अप करताना ती कॅमेऱ्यात कैद झाली होती.

डेक्कन चार्जर्स इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत हैदराबाद शहराचे प्रातिनिधित्व करणारा संघ होता.

या टीमचे मालक असलेल्या टी वेंकटराम रेड्डी यांची मुलगी गायत्री रेड्डी मॅचदरम्यान केंद्रबिंदू ठरली होती.

बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रीती झिंटा आयपीएलमधील गोंडस मालकीण आहे.

पंजाब किंग्स या संघाची ती सह मालकीण आहे. अनेकदा प्रीती झिंटा टीमला प्रोत्साहन देताना दिसते.

सनरायझर्स हैदराबाद या संघाचे मालकी हक्क असलेल्या कलानिधी मारन यांची कन्या काव्या मारन २०१८ च्या आयपीएलमधील मॅचदरम्यान चर्चेचा विषय ठरली होती. (फोटो : आयपीएल / ट्विटर)

टीमला प्रोत्साहन देताऱ्या काव्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं.

(सर्व फोटो : इंडियन एक्क्सप्रेस)