
जगातील सर्वात मोठी टी-२० लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (IPL).

या स्पर्धेत खेळण्यासाठी अनेक युवा, दिग्गज खेळाडू आतूर असतात. पैसा आणि प्रसिद्धी ही त्यामागची दोन कारणे आहेत.

यंदा इंडियन प्रीमियर लीगचा पंधरावा हंगाम येत्या २६ मार्चपासून सुरु होतोय.

जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघातून खेळतो.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाला आतापर्यंत एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलं नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीने आतापर्यंत इंडियन प्रीमियर लीगमधून १,५८,२०,००,००० (१५० कोटी) रुपये कमावले आहेत.

‘हिटमॅन’ रोहित शर्मा २०११ मध्ये मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेला होता.

२०१३मध्ये रोहितने मधल्या हंगामापासून कर्णधारपद स्वीकारले आणि त्याच वर्षी संघाला चॅम्पियन बनवले.

मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेचे पाच किताब आपल्या नावावर केले आहेत.

मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये किताब जिंकला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार रोहित शर्माने आतापर्यंत इंडियन प्रीमियर लीगमधून १,६२,६०,००,००० (१६० कोटी) रुपये कमावले आहेत.

‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनी अजूनही आयपीएलमधील आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे.

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार महेंद्रसिंह धोनीने आतापर्यंत इंडियन प्रीमियर लीगमधून १,६४,८४,००,००० (१६४ कोटी) रुपये कमावले आहेत.

(सर्व फोटो सौजन्य : ट्विटर)