
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर युवराज सिंग त्याच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त आहे. युवराज सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय राहू लागला आहे. अनेकदा तो क्रिकेट मैदानाशी संबंधित आठवणी चाहत्यांशी शेअर करत असतो. नुकतच त्याने फोटोशूट करून जुने दिवस आठवले आहेत.(सर्व फोटो – युवराज इन्स्टाग्राम)

युवराज सिंगने ड्रेसिंग रूमच्या सेटअपवर हे फोटोशूट केले आहे.

या फोटोंमध्ये तो टीम इंडियाच्या जर्सीत दिसत आहे.

गेलेले दिवस आठवत आहे, असं फोटो शेअर करत युवराज सिंगने लिहिले आहे.

युवराज सिंग २०११ च्या वर्ल्ड कपचा हिरो होता. हा चषक भारताने जिंकला आणि ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ देखील युवराजच ठरला होता.

युवराज सिंगच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, त्याने अभिनेत्री हेजल कीचशी लग्न केले आहे.