
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच सामने अटीतटीचे होत आहेत. या हंगामात अनेक नव्या खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी करुन दाखवली आहे.

हैदराबाद सनरायझर्सकडून खेळणारा वेगवान गोलंदाज उमरान मलिक हादेखील त्यांच्यापैकीच एक आहे.

त्याच्या भेदक गोलंदाजीपुढे दिग्गज फलंदाजांनी हात टेकले आहेत. त्याने आयपीएलच्या १५ व्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू फेकला आहे.

उमरान मलिकने प्रतितास १५७ किमीच्या वेगाने चेंडू फेकनूही तो आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकणारा गोलंदाज नाहीये. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया की आयपीएलच्या इतिहासातील टॉप पाच सर्वात वेगवान चेंडू.

आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज शॉन टेट पहिल्या क्रमांकावर आहे.

त्याने दिल्ली कॅपिटल्सविरोधात खेळताना १५७.७ किमी प्रतितास या वेगाने चेंडू टाकला होता.

त्यानंतर उमरान मलिकने दिल्ली कॅपिटल्सविरोधात खेळताना १५७ किमी प्रतितास या वेगाने चेंडू टाकला. हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान असा दुसरा चेंडू ठरला.

दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज ऑनरिच नॉर्टजे याने आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात वेगवान चेंडू टाकला. त्याने १५६.२ किमी प्रतितास या वेगाने चेंडू फेकला होता.

त्यानंतर आयपीएल २०२२ मधील ५० व्या सामन्यातच उमरान मलिकने १५५.६० किमी प्रतितास या वेगाने चेंडू फेकला.

मलिकने फेकलेला हा चेंडू आयपीएलच्या इतिहासातील चौथा सर्वात वेगवान चेंडू ठरला.

उमरान मलिकच्या या गोलंदाजीचे सर्वांनीच कौतुक केले.

ऑनरिच नॉर्टजेने आयपीएलच्या २०२० मधील हंगामामध्ये राजस्थान रॉयल्सविरोधात खेळताना १५५.२ किमी प्रतितास या वेगाने चेंडू फेकला होता. हा आयपीएलच्या इतिहासातील पाचवा सर्वात वेगवान चेंडू ठरला.