
भारतीय संघ तसेच चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज दीपक चहर लवकरच बोहल्यावर चढणार आहे.
येत्या १ जून रोजी दीपक त्याची प्रेमिका जया भारद्वाजशी लग्न करणार आहे.
जया भारद्वाज एका खासगी कंपनीत काम करते.
दीपक चहर आणि जया भारद्वाज बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखतात.
दीपक चहरने आयपीएल २०२१ पर्वामध्ये प्लेऑफच्या सामन्यादरम्यान जया भारद्वाजला प्रपोज केले होते.
चेन्नई विरुद्ध पंजाब किंग्ज या सामन्यादरम्यान दीपक चहरने स्टेडियममध्ये सर्वांसमोर जया भारद्वाजला लग्नाची मागणी घातली होती.
विशेष म्हणजे दीपकला जया भारद्वाजने होकार दिला होता. त्यानंतर आता ते लग्नबंधनात अडकणार आहेत.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज फ्रेंचायझीने दीपक चहरला या हंगामात १४ कोटी रुपयांना खरेदी केले होते.
मात्र पाठीला दुखापत झाल्यामुळे दीपक चहरने आयपीएलमधून माघार घेतली. सध्या तो बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे.