
निखत झरीन या भारतीय बॉक्सरने गुरुवारी इतिहास रचला. निकहतने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. (फोटो – BFI)

५२ किलो गटात निखतने थायलंडच्या जितपॉन्ग जुटामासचा ५-० असा पराभव केला. (Twitter/Boxing Federation)

२५ वर्षीय निकहत झरीन ही पाचवी भारतीय महिला बॉक्सर आहे, जिने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. (फोटो – BFI)

बॉक्सिंग लिजेंड मेरी कोमने या चॅम्पियनशिपमध्ये ६ वेळा सुवर्ण जिंकून विक्रम केला आहे. या चॅम्पियनशिपमध्ये मेरी कोम व्यतिरिक्त निखत, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी यांनीही सुवर्णपदक पटकावले आहे. (फोटो सौजन्य Tashi Tobgyal)

निकहतचा जन्म १४ जून १९९६ रोजी निजामाबाद, तेलंगणा येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव मुहम्मद जमील अहमद आणि आईचे नाव परवीन सुलताना आहे.

निकहतने वयाच्या १३ व्या वर्षी बॉक्सिंगचे ग्लोज हाती घेतले होते. (फोटो – इन्स्टाग्राम)

निकहतची मेरी कोम हिच्यासोबत अनेकदा लढत झाली आहे. (फोटो सौजन्य Tashi Tobgyal)

भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ५१ किलो वजनी गटासाठी मेरी कोमची चाचणी न करता निवड केली होती. (फोटो सौजन्य Tashi Tobgyal)

निकहतला भविष्यातील सामन्यांसाठी बाजूला ठेवत असल्याचे राजेश भंडारी यांनी सांगितले होते.

अशा परिस्थितीत निकहतने क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांना पत्र लिहून याविरोधात आवाज उठवला होता. (फोटो – इन्स्टाग्राम)

या संपूर्ण वादानंतर मेरी कोमचा सामना झाला. त्यात निकहतशी बरोबरी झाली, ज्यामध्ये मेरी कोमने बाजी मारली. (फोटो सौजन्य Tashi Tobgyal)

या दोन बॉक्सर्समधील तणाव इतका होता की विजयानंतर मेरी कोमने निकहतशी हस्तांदोलनही केले नाही. (फोटो सौजन्य Tashi Tobgyal)

निकहतने टोक्यो ऑलिम्पिकसाठी चाचणी घेण्याची मागणी केली तेव्हा मेरी कोमने पत्रकारांसमोर विचारले, ‘निखत जरीन कोण आहे?’ (फोटो सौजन्य Tashi Tobgyal)

आता वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर झरीनने तिला उत्तर दिले आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)

पदक जिंकल्यानंतर निकहतने पत्रकारांना विचारले- माझे नाव ट्विटरवर ट्रेंड करत आहे का? (फोटो – इन्स्टाग्राम)

निकहतने २०१० मध्ये नॅशनल सब ज्युनियर मीटमध्ये कारकिर्दीतील पहिले पदक जिंकले. (फोटो – इन्स्टाग्राम)

पुढच्याच वर्षी वयाच्या १५ व्या वर्षी निकहतने देशाला आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक मिळवून दिले होते. (फोटो – इन्स्टाग्राम)

२०११ मध्ये तुर्कीमध्ये झालेल्या महिला ज्युनियर आणि यूथ वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने फ्लायवेटमध्ये सुवर्ण जिंकले. (फोटो – इन्स्टाग्राम)