
काही दिवसांपूर्वीच भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मितालीने आता थेट मिस इंडियाच्या स्टेजवर एंट्री केली आहे.

फेमिना मिस इंडिया २०२२ स्पर्धेत मिताली सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

या सौंदर्य स्पर्धेतील परीक्षकांमध्ये मितालीचा समावेश होता.

मिताली अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये या स्पर्धेत पोहचली होती.

कोट आणि बेलबॉटम पँटमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती.

यापूर्वी देखील ती फॅशन इंडस्ट्रीतील काही कार्यक्रमांमध्ये दिसली होती.

भारतीय संघाची कर्णधार असताना तिने लॅक्मे फॅशन वीकमध्ये हजेरी लावली होती.

तिथे तिने मॉडेल्ससोबत रॅम्पवॉक करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. (फोटो सौजन्य – मिताली राज इन्स्टाग्राम)