
भारतीय संघांचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीचा आज ४१वा वाढदिवस आहे.

मैदानावरील धुवांधार खेळीप्रमाणेच त्याच्या कौतुकास्पद कृतींमुळे कॅप्टन कूल मैदानाबाहेरही कायमच चर्चेत असतो.

धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीदेखील त्याच्या चाहत्यांमधे तसूभरही कमी झालेली नाही.

क्रिकेटप्रमाणेच धोनीचं गाड्यांवरही विशेष प्रेम आहे. धोनी सोशल मीडियावर फारसा सक्रीय नसला तरी त्याचं गाडीप्रेम लपून राहिलेलं नाही.

धोनीकडे सुपर बाईक्स आणि लक्झरी कारचं कलेक्शन आहे. त्यांच्या खरेदीसाठी त्याने कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत.

या गाड्यांसाठी धोनीने दोन मजल्याचं बाईक आणि कार कलेक्शन गॅरेज उभारलं आहे.

शेकडो बाईक्स आणि लक्झरी कार असलेल्या धोनीच्या गॅरेजचा हा फोटो आहे.

धोनीची सर्वात पहिली बाईक ‘यमाहा राजदूत’.

‘कवासाकी निंजा झेडएक्स १४ आर’ ही जगातील सर्वात लोकप्रिय असणाऱ्या बाइक्सपैकी एक असलेली बाईक धोनीकडे आहे.

‘कॉनफेडीरेट एक्स १३२ हेलकॅट’ ही बाईकही धोनीच्या कलेक्शनमध्ये आहे. याची किंमत सुमारे ३० लाख रुपये इतकी आहे.

धोनीकडे ‘हार्ली डेव्हिडसन फॅट बॉय’ या बाईकचे टॉप मॉडेल आहे.

इटालियन बनावटीची असलेली ‘डुकाटी १०९८ एस’ ही बाईक धोनीच्या ताफ्यात आहे.

धोनीच्या बाईक्स कलेक्शनमध्ये रॉयल इनफिल्ड मिचिस्मो, सुझूकी शगून, यमाहा आरडी३५०, यमाहा व्हायझेएफ ६०० आर, बीएसए गोल्डस्टार, हार्डली डेव्हिडसन आर्यन ८८३ सारख्या क्लासिक बाईक्सचा समावेश आहे.

बाईक्सप्रमाणेच धोनी विंटेज आणि लक्झरी कारचादेखील शौकीन आहे.

त्याच्या गॅरेजमध्ये सगळ्यात महागड्या आणि क्लासिक मानल्या जाणाऱ्या मर्सिडीज-बेंझ या कंपनीची ‘मर्सिडीज-बेंझ जीएलई’ ही कार आहे.

धोनीकडे ६९ लाख किंमताची ‘ऑडी क्यू ७’ ही लक्झरी कारसुद्धा आहे.

याशिवाय धोनीच्या गॅरेजमध्ये जीप ग्रँड चेरोकी ट्रॅकहॉकसारख्या काही अप्रतिम चारचाकी गाड्या देखील आहेत.

काही महिन्यांपूर्वीच धोनीने ‘लँड रोव्हर-३ एसयूव्ही’ ही विंटेज कारही खरेदी केली.

धोनीकडे असलेल्या या लक्झरी गाडीची किंमत सुमारे १.६ करोड इतकी आहे.

याशिवाय धोनीने क्रिकेट सामन्यांमध्ये सामनावीर म्हणून मिळालेल्या सर्व मोटारसायकलही जपून ठेवल्या आहेत.

धोनी आपल्या गाड्यांची स्वत: निगा राखतो.

गॅरेजमधील गाड्यांची देखभाल आणि डागडुजी तो करत असतो.

अनेकदा धोनी कार आणि बाइक्स चालवताना दिसला आहे.(सर्व फोटो : महेंद्रसिंह धोनी/ इन्स्टाग्राम, इंडियन एक्सप्रेस)