-
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
-
स्टोक्स मंगळवारी (१९ जुलै) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे.
-
आपल्या खेळाबरोबरच बेन स्टोक्स ‘बॅड बॉय’ इमेजमुळेही अनेकदा चर्चेत राहिलेला आहे.
-
बेन स्टोक्सला २०११ मध्ये दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
-
२०१४ मध्ये एका सामन्यादरम्यान बाद झाल्यानंतर त्याने ड्रेसिंग रूमच्या लॉकरवरची तोडफोड केली होती.
-
त्यानंतर २०१७मध्ये त्याने ब्रिस्टलमधील नाईट क्लबमध्ये एका व्यक्तीला मारहाण केली होती.
-
बेन स्टोक्स आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यांचेही मैदानावर अनेकदा वाद झाले आहेत.
-
असे असले तरी २०१९ विश्वचषकामध्ये इंग्लंडसाठी तो ‘हिरो’ ठरला होता.
-
त्याने नाबाद ८४ धावांची खेळी करून इंंग्लंडला पहिला विश्वचषक जिंकण्यास मदत केली होती.
-
मैदानावर ‘बॅड बॉय’ असलेला बेन स्टोक्स खासगी आयुष्यात एक परफेक्ट ‘फॅमिली मॅन’ आहे.
-
बेन आणि माजी रग्बी प्रशिक्षक असलेले त्याचे वडील जेरार्ड स्टोक्स यांच्यात फार जवळीक आहे.
-
बेन स्टोक्सने ऑक्टोबर २०१७मध्ये दीर्घकाळापासून मैत्रीण असलेल्या क्लेअर रॅटक्लिफसोबत लग्नगाठ बांधली.
-
बेन आणि क्लेअरला दोन लेटन आणि लिब्बी नावाची दोन अपत्ये आहेत.
-
फावल्या वेळेत बेन आणि लहानगा लेटन एकत्र गोल्फ खेळतात.
-
बेन स्टोक्सला प्राण्यांची आवड असून त्याच्याघरी दोन कुत्री आणि ससे पाळलेले आहेत. (सौजन्य : बेन स्टोक्स इन्स्टाग्राम/ ट्विटर )

“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक