-
नव्या संसदेच्या इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ( २८ मे ) उद्घाटन केलं. दुसरीकडं जंतर-मंतर मैदानावर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे.
-
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचं आरोप केला आहे. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे.
-
पण, अटकेच्या मागणीसाठी २३ एप्रिलपासून कुस्तीपटू जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत.
-
नव्या संसदेचं उद्घाटन होत असताना आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं सांगत या खेळाडूंकडून जंतर-मंतरवरून कूच करत आज संसदेसमोर ‘महापंचायत’ भरवण्यात येणार होती.
-
मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी बळाचा वापर करत अनेक खेळाडूंना ताब्यात घेतलं आहे.
-
जंतर-मंतर मैदानातून संसदेच्या दिशेने कूच करण्याच्या प्रयत्नात असलेले कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांना पोलिसांनी फरफरट नेत जबरदस्ती आपल्या वाहनात बसवलं.
-
एकीकडे खेळाडूंवर अटकेची कारवाई होत असताना दुसरीकडे आंदोलनास्थळावरील खेळाडूंच्या गाद्या, पंखे आणि इतर साहित्यही पोलिसांनी हटवलं.
-
त्यामुळे या खेळाडूंना पुन्हा जंतर-मंतरवर आंदोलनासाठी बसता येऊ नये, अशी व्यवस्था तर पोलिसांकडून करण्यात आल्याचं दिसत आहे.
-
साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळातून अभिमानस्पद कामगिरी केली आहे. त्याच खेळाडूंवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण