-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, २३ सप्टेंबर रोजी वाराणसीमध्ये भगवान शिव-थीम असलेल्या क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली. १२१ कोटी रुपयांच्या जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या या स्टेडियमसाठी सुमारे ४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. (Source: @myogiadityanath/twitter)
-
या स्टेडियमचे फ्लडलाइट त्रिशूळाच्या आकारात असतील. स्टेडियमच्या पायाभरणीपूर्वी पीएम मोदींच्या अकाऊंटवरून स्टेडियमचे अनेक अॅनिमेटेड फोटो शेअर करण्यात आले आहेत. (Source: the_india_moment/instagram)
-
वाराणसीच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या पायाभरणीसाठी आलेल्या सचिन तेंडुलकरने श्री काशी विश्वनाथ मंदिरात पूजा केली. (Source: @mufaddal_vohra/twitter)
-
स्टेडियमच्या सजावटीसाठी बेलपत्राच्या आकाराचे धातूचे पत्रे वापरले जाणार आहेत. कारण भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केले जाते. (Source: the_india_moment/instagram)
-
सचिन तेंडुलकरने नरेंद्र मोदींना खास जर्सी भेट दिली. या जर्सीच्या समोरील बाजूवर टीम इंडिया लिहिलेले आहे, तर मागे ‘नमो’ असे नाव लिहले आहे. (Source: @DDNewsHindi/twitter)
-
या स्टेडियमचा एक भाग ड्रमच्या आकारात असेल. पायाभरणीनंतर पंतप्रधान म्हणाले की, हे स्टेडियम पूर्णपणे भगवान शिवाला समर्पित असेल. (Source: the_india_moment/instagram)
-
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी पंतप्रधान मोदींना एक खास भेटवस्तू दिली. या कार्यक्रमासाठी माजी क्रिकेटरही उपस्थित होते. (Source: @DDNewsHindi/twitter)
-
एआयच्या मदतीने तयार केलेल्या चित्रांमध्ये सामना पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक त्यांच्या गाड्या कुठे पार्क करू शकतील आणि स्टेडियम बाहेरून कसे दिसेल हे देखील दर्शविते. (Source: the_india_moment/instagram)
-
या स्टेडियमची आसन क्षमता अंदाजे ३०,००० असेल आणि त्यात चंद्रकोरीच्या आकाराचे छताचे आवरण असणार आहे. (Source: the_india_moment/instagram)
निरीक्षण करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यानी केला पॅरामोटरचा उपयोग! Video पाहून नेटकरी म्हणाले; भविष्यात ड्रोन…