-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी जे काही करतो ते नेहमीच थोडं हटके असतं. अलिकडेच त्याने नवीन हेअरस्टाईल केली आहे. (PC : @aalimhakim/instagram)
-
तो त्याच्या नवीन हेअरस्टाइलमुळे चर्चेत आला आहे. माहीचा हा नवा लूक इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे. या लेटेस्ट लूकमध्ये माही देखणा दिसत आहे. (PC : @aalimhakim/instagram)
-
अलिकडेच धोनीचे काही फोटो समोर आले होते ज्यात त्याने वाढवलेले केस दिसत होते. तेव्हा अनेकांना वाटलं होतं की, धोनी त्याच्या जुन्या २००७ मधल्या लूकमध्ये दिसणार आहे. पंरतु, धोनीने नवीन हेअरस्टाईल केली आहे. (PC : @aalimhakim/instagram)
-
हेअरस्टायलिस्ट आलीम हकीमने धोनीला ही नवीन हेअरस्टाईल दिली आहे. आलीमने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. (PC : @aalimhakim/instagram)
-
काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि डार्क ग्लेअर्स (चष्मा) लावलेला धोनी डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. (PC : @aalimhakim/instagram)
-
आलीमने या हेअरस्टाईलमागची गोष्टदेखील सांगितली आहे. त्याने म्हटलं आहे की, एका चाहत्याने धोनीचं चित्र काढलं होतं. ते पाहून धोनीने मला तशीच हेअरस्टाईल करायला सांगितली. (PC : @aalimhakim/instagram)
-
हकीमने म्हटलं आहे की, ते चित्र पाहून मी धोनीला केस वाढवून यायला सांगितलं आणि त्यानंतर आम्ही ही हेअरस्टाईल केली. (PC : @aalimhakim/instagram)
-
हकीमने म्हटलं की, त्यानंतर धोनीने केस वाढवले. मुळात मी स्वतः माही भाईच्या लांब केसांचा चाहता आहे. त्यामुळे ही हेअरस्टाईल करताना मला मजा आली. (PC : @aalimhakim/instagram)
-
आलिम हकीम हा बॉलिवूडचा टॉप हेअर ड्रेसर आहे. ‘रॉकस्टार’, ‘बर्फी’, ‘रोबोट’ आणि ‘बाहुबली’ सारख्या चित्रपटांमधील मुख्य पात्रांना दिलेली हेअरस्टाईल ही आलीम हकीमच्या कात्रीची (कैची) कमाल आहे. (PC : @aalimhakim/instagram)
-
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्याचे लांब केस होते. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी त्याने त्याचे केस लहान केले. तर विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने टक्कल केलं होतं. (PC : @aalimhakim/instagram)

धीरज साहूंच्या घरात नोटांचा पर्वत, खासदाराच्या ‘दौलती’बाबत काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, अडचणी वाढल्या