-
सराव सामना
ऑस्ट्रेलिया आणि नामिबियामध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकातील सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. -
संघ
पहिल्या सराव सामन्यासाठी संघाचे १५ पैकी ९ खेळाडू उपस्थित होते. त्यामुळे संघाचे प्रशिक्षक, निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली हे मैदानात यष्टीरक्षण करताना दिसले -
जोश हेझलवूड
जोश हेझलवूडने या सराव सामन्यात कमालीचा स्पेल टाकला. त्याने ४ षटकांत २ विकेट्स घेत अवघ्या ५ धावा दिल्या तर अॅडम झाम्पाने ३ विकेट्स घेतल्या. -
गोलंदाजी
ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर नामिबियाचा संघ २० षटकांत ९ बाद ११९ धावाच करू शकला. -
वॉर्नर फॉर्मात परतला
ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने २० षटकांत अर्धशतक झळकावत संघाला अवघ्या १० षटकांत विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. -
चार सबस्टीट्यूट
ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात चार पर्यायी खेळाडू होते. ज्यात मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड, सहाय्यक प्रशिक्षक ब्रॅड हॉज आणि आंद्रे बोरोवेक तसेच राष्ट्रीय निवडकर्ता जॉर्ज बेली यांचा समावेश होता. -
फिल्डींग
फिल्डिंग कोच असलेले आंद्रे बोरोवेक आणि जॉर्ज बेली हे सामना सुरू झाला तेव्हा सबस्टीट्यूट म्हणून मैदानावर खेळताना दिसले. (सर्व फोटो- क्रिकेट ऑस्ट्रेलिया) -
सहा खेळाडू अनुपस्थित
ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप संघातील १५ खेळाडूंपैकी ६ खेळाडू अद्याप संघात दाखल झालेले नाहीत. ट्रेव्हिस हेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन आणि मार्कस स्टॉयनिस हे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत होते, त्यामुळे ते सध्या विश्रांती घेत आहेत. (फोटो-पॅट कमिन्स सोशल मीडिया)

पूजा करताना आला हृदयविकाराचा झटका, ४५ वर्षीय अभिनेत्याचे निधन