-
रियल माद्रिदचा फुटबॉलपटू अँड्रिकने लग्न केले आहे. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी या खेळाडूने मॉडेल आणि इन्फ्लुएंसर गॅब्रिएल मिरांडासोबत लग्न केले.
-
अँड्रिकची पत्नी त्याच्यापेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे. स्टार फुटबॉलपटूने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली. दोघांना भेटल्याच्या एक वर्षाहून कमी कालावधीमध्ये हा विवाह झाला आहे.
-
द सनच्या वृत्तानुसार, दोघांनी लग्नाआधी एक करार केला आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे. या करारानुसार दोघांना चार शब्द बोलण्यास सक्त मनाई आहे.
-
हे चार शब्द um (अम), well (वेल), okay(ठीक आहे) आणि beautiful (सुंदर) दोघेही हे चार शब्द संभाषणात वापरू शकणार नाहीत.
-
याशिवाय दोघांनीही प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना सांगणे अनिवार्य आहे की, “काहीही झाले तरी आम्ही एकत्र आहोत.”
-
या कराराबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी त्याला पाठिंबा दिला आहे. तर काहींना या अटी अजिबात आवडल्या नाहीत.
-
अँड्रिक या वर्षी स्पॅनिश क्लब रिअल माद्रिदमध्ये सामील झाला आहे. ब्राझीलचा हा खेळाडू वेम्बली स्टेडियमवर गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
-
(Photos Source-Eendrick/ Instagram)

Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”