-
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयी घोडदौड कायम ठेवत सलग तिसरा विजय प्राप्त केला आहे. आधी बांगलादेश नंतर पाकिस्तान आणि काल न्यूझिलंडला हरवत भारताने आता स्पर्धेत थेट सेमीफायनल गाठली आहे. (सर्व फोटो- लोकसत्ता संग्रहित)
-
दरम्यान आता या सामन्यांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये उपांत्यफेरीचा सामना रंगणार आहे.
-
हा सामना ४ मार्च रोजी दुबईच्या मैदानावर होणार आहे. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट सामन्यांची गोष्टच खूप रंजक ठरते. या दोन्ही संघानी नेहमी एकमेकांना तगडी फाईट दिलेली आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट संघही ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक वाटतो.
-
या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये कोण किती सामने जिंकले आहे ते जाणून घेऊयात.
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया १५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. सामन्यांपैकी भारताने ५७ सामने जिंकले आहेत तर ऑस्ट्रेलियाने ८४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. १० सामने अनिर्णित संपले आहेत.
-
यापैकी फक्त चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल बोलायचे झाले तर भारत आणि ऑस्ट्रेलिया चार वेळा आमने सामने आले आहेत. यापैकी २ सामने भारताने जिंकले आहेत तर १ सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. तर १ सामना अनिर्णित राहिला आहे.
-
२०१० पासून आयसीसी बाद फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी
एकदिवसीय विश्वचषक २०११ उपांत्यपूर्व फेरी: भारत पाच गडी राखून जिंकला -
एकदिवसीय विश्वचषक २०१५ उपांत्य फेरी: ऑस्ट्रेलिया ९५ धावांनी जिंकला
-
एकदिवसीय विश्वचषक २०२३ अंतिम सामना: ऑस्ट्रेलिया सहा गडी राखून जिंकला
-
दरम्यान, भारताला २०२३ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रलियाकडून पराभूत व्हावं लागलं होतं.
-
या सगळ्याचा वचपा काढण्याची संधी यावेळी भारताकडे आलेली आहे.

Aligarh Love Story: पळून गेलेले सासू-जावई दहा दिवसांनी परतले घरी, सासू आता म्हणते…