-
RCB vs PBKS IPL Match: तब्बल १८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर विराट कोहलीचे (Virat Kohli) आयपीएल विजयाचे (IPL 2025 Final) स्वप्न अखेर साकार झाले.
-
मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) झालेल्या अंतिम सामन्यात बंगळूरु संघाने पंजाबवर सहा धावांनी मात करत जेतेपदावर नाव कोरले.
-
अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात बंगळूरुने (Royal Challengers Bengaluru) प्रथम फलंदाजी करताना १९१ धावांचे लक्ष्य पंजाबसमोर ठेवले होते.
-
सुरुवात चांगली झालेल्या पंजाबचा (Punjab Kings) डाव नंतर मात्र ढेपाळला.
-
बंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावा केल्या होत्या.
-
ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहली म्हणाला, “आरसीबीचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं, हा सीझन मी कधीच विसरणार नाही”.
-
“आम्ही गेल्या अडीच महिन्याच्या या प्रवासाचा कमालीचा आनंद लुटला आहे.”
-
“ही ट्रॉफी आरसीबीच्या चाहत्यांसाठी आहे, ज्यांनी आमच्या वाईट काळात आमची कधीच साथ सोडली नाही.”
-
“ही ट्रॉफी इतक्या वर्षांचा हार्टब्रेक आणि निराशेसाठी आहे.”
-
“संघ म्हणून खेळताना मैदानावर केलेल्या प्रत्येक छोट्या प्रयत्नासाठी आहे.”
-
(सर्व फोटो सौजन्य : विराट कोहली आणि आयपीएल/इन्स्टाग्राम)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल