-
IND vs ENG दुसरा कसोटी सामना:
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना २ जुलैपासून बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडिया मालिका बरोबरीत आणण्यासाठी सज्ज आहे. लीड्सच्या तुलनेत या मैदानाची खेळपट्टी वेगळी असणार आहे. पहिल्या कसोटीत ऋषभ पंतने दोन्ही डावांत दमदार शतके ठोकली, तर इंग्लंडकडून ऑली पोप आणि बेन डकेट यांनी शानदार फलंदाजी केली. -
पहिल्या कसोटीत जो रूट पहिल्या डावात केवळ २८ धावा करू शकला, पण दुसऱ्या डावात नाबाद ५३ धावा करून त्याने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडसाठी दिलासादायक बातमी म्हणजे वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे संघात पुनरागमन. त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.
-
ऋषभ पंत
रेड बॉल क्रिकेटमध्ये ऋषभ पंतची कामगिरी खूप चांगली आहे. लीड्समध्ये दोन्ही डावांत शतके झळकावून त्याने आपली ताकद सिद्ध केली आहे. अनुभवी उपकर्णधार म्हणून तो कोणत्याही गोलंदाजावर तुटून पडू शकतो. -
यशस्वी जयस्वाल
पदार्पणापासूनच यशस्वीने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. संघाची सुरुवात भक्कम करण्यासाठी त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. चांगली खेळी केली तर इंग्लंडच्या गोलंदाजांची लय बिघडू शकते. -
जो रूट
एजबॅस्टनवर सर्वाधिक धावा करणारा जो रूट पुन्हा एकदा धोकादायक ठरू शकतो. पहिल्या डावात अपयश आले तरी दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतकाने त्याने संघाला विजय मिळवून दिला. भारतासाठी त्याला थांबवणे महत्त्वाचे आहे. -
जोफ्रा आर्चर
जोफ्रा आर्चर रेड-बॉल क्रिकेटमध्ये परततो आहे. जरी तो अलीकडे जास्त खेळला नसला तरी त्याचा वेग आणि अचूकता कोणत्याही फलंदाजाला हैराण करू शकते. फिटनेसशी संबंधित प्रश्न असूनही तो इंग्लंडसाठी मोठा इम्पॅक्ट खेळाडू ठरू शकतो. -
मोहम्मद सिराज
बुमराहच्या अनुपस्थितीत सिराजकडे वेगवान माऱ्याचे नेतृत्व आहे. पहिल्या कसोटीत तो फारसा चमकला नाही, पण योग्य लय मिळाल्यास तो धोकादायक ठरतो. भारताला विजय हवा असेल तर सिराजला जोरदार कामगिरी करावी लागेल.

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान