-
भारताचा क्रिकेटपटू, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील घटस्फोटाचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. (Photo – ANI)
-
कोलकाता उच्च न्यायालयाने आठवड्याच्या सुरुवातीला मोहम्मद शमीला मोठा झटका देत पत्नी आणि मुलीच्या देखभालीसाठी दरमहा ४ लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते. (Photo – Hasin Jahan Instagram)
-
न्यायालयाच्या निकालानुसार, पत्नी हसीन जहाँसाठी दरमहा दीड लाख आणि मुलीसाठी दरमहा अडीच लाख रुपये देण्याचे आदेश मोहम्मद शमीला देण्यात आले आहेत. याआधी तो पत्नी आणि मुलीसाठी ८० हजार रुपये देत होता. (Photo – Hasin Jahan Instagram)
-
मात्र हसीन जहाँने चार लाख रुपयेदेखील कमी असल्याचे म्हटले आहे. (Photo – Hasin Jahan Instagram)मोहम्मद शमी ज्यापद्धतीने आयुष्य जगतो, त्यानुसार आम्हाला १० लाख रुपये दरमहा मिळायला हवेत, असे हसीन जहाँने म्हटले आहे. (Photo – Hasin Jahan Instagram)
-
हसीन जहाँने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, आमच्या जीवनशैलीचा खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे आम्ही अधिकचा देखभाल खर्च मिळावा. तरीही कोलकाता उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर मी समाधान व्यक्त करते. (Photo – Hasin Jahan Instagram)
-
२०१८ सालापासून हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी यांच्यात न्यायालयीन लढा सुरू आहे. याआधी अलीपूर सत्र न्यायालयाने मोहम्मद शमीला दरमहा ८० हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. (Photo – Hasin Jahan Instagram)
-
२०१४ साली मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ विवाहबद्ध झाले होते. त्याआधी हसीन जहाँ कोलकाता नाईट राईडर्स संघासाठी मॉडेल आणि चिअर लीडर म्हणून काम करत होती. (Photo – Hasin Jahan Instagram)
-
मात्र २०१८ नंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. हसीन जहाँने मोहम्मद शमीवर कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी त्रास दिल्याचा आरोप लावला. (Photo – Hasin Jahan Instagram)
-
कौटुंबिक हिंसाचारासह मोहम्मद शमी क्रिकेट फिक्सिंगमध्येही सहभागी असल्याचा खळबळजनक आरोपही हसीन जहाँने केला होता. ज्यामुळे बीसीसीआयने त्याचा करार संपुष्टात आणला होता. चौकशीनंतर त्याचे पुन्हा संघात पुनरागमन झाले होते. (Photo – Hasin Jahan Instagram)

Today’s Horoscope: शिव योगामुळे कोणाचा मर्जीप्रमाणे जाईल दिवस तर कोणाची काळजी होईल दूर? वाचा शुक्रवारचे राशिभविष्य