-
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलने शानदार फलंदाजी करताना २६९ धावा केल्या. या खेळीसह गिलने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी एका डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शुभमन गिल सातव्या स्थानावर आला आहे. आज आपण कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप १० भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. (फोटो – बीसीसीआय)
-
भारताचा दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग या यादीत अव्वल स्थानावर आहे. सेहवागने २६ मार्च २००८ रोजी चेन्नई येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३१९ धावा केल्या. ज्यामध्ये त्याने ४२ चौकार आणि ५ षटकार मारले. (फोटो – सोशल मीडिया)
-
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर देखील वीरेंद्र सेहवाग याचेच नाव आहे. सेहवागने २८ मार्च २००४ रोजी मुल्तान येथे पाकिस्तानविरुद्ध ३०९ धावा केल्या. ज्यामध्ये त्याने ३९ चौकार आणि ६ षटकार मारले. (फोटो – सोशल मीडिया)
-
आठ वर्षांनी नुकताच संघात परतलेला करुण नायर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. करुण नायरने १६ डिसेंबर २०१६ रोजी चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध नाबाद ३०३ धावा केल्या. त्याने ३२ चौकार आणि ३ षटकार मारले. (फोटो – सोशल मीडिया)
-
चौथ्या क्रमांकावर देखील वीरेंद्र सेहवागचे नाव आहे. सेहवागने २ डिसेंबर २००९ रोजी श्रीलंकेविरुद्ध २९३ धावा केल्या. ज्यामध्ये त्याने ४० चौकार आणि ७ षटकार मारले. (फोटो – सोशल मीडिया)
-
या यादीत व्हीव्हीएस लक्ष्मणचे नाव पाचव्या स्थानावर आहे. लक्ष्मणने ११ मार्च २००१ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध २८१ धावा केल्या. ही अनेक संस्मरणीय खेळींपैकी एक आहे. लक्ष्मणने ४४ चौकार मारले. (फोटो – सोशल मीडिया)
-
या यादीत भारताचा दिग्गज फलंदाज राहुल द्रविडचे नाव सहाव्या स्थानावर आहे. द्रविडने १३ एप्रिल २००४ रोजी पाकिस्तानविरुद्ध २७० धावांची खेळी खेळली. ज्यामध्ये त्याने ३४ चौकार आणि १ षटकार मारला. (छायाचित्र – एक्सप्रेस फाइल फोटो)
-
या यादीत शुभमन गिलचा समावेश नुकताच झाला आहे. शुभमन गिलने ३ जुलै २०२५ रोजी एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडविरुद्ध २६९ धावांची दमदार खेळी केली. त्याने ३० चौकार आणि ३ षटकार मारले. (छायाचित्र – बीसीसीआय)
-
भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली हा देखील या यादीत आठव्या स्थानावर आहे. विराट कोहलीने १० ऑक्टोबर २०१९ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद २५४ धावा केल्या. ज्यामध्ये त्याने ३३ चौकार आणि २ षटकार मारले. (फोटो – सोशल मीडिया)
-
या यादीत पुन्हा विरेंद्र सेहवाग याचे नाव येते. सेहवागने १३ जानेवारी २००६ रोजी पाकिस्तानविरुद्ध २५४ धावांची खेळी केली. ज्यामध्ये त्याने ४७ चौकार आणि १ षटकार मारला होता. (फोटो – सोशल मीडिया)
-
या यादीत १० व्या स्थानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव आहे. सचिनने १० डिसेंबर २००४ रोजी बांगलादेशविरुद्ध नाबाद राहिला.

Devendra Fadnavis : टीकेनंतरही फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार, पण उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “रुदाली…”