-

महिला विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. पण भारताच्या या वर्ल्डकपमधील अंतिम सामन्यापर्यंतच्या प्रवासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या भारताच्या १६ खेळाडू कोण आहेत, जाणून घेऊया.
-
हरमनप्रीत कौर-भारतीय संघाची कर्णधार व अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरने सेमीफायनलने महत्त्वपूर्ण खेळी केली. हरमनप्रीत कौर ही नॉकआऊट सामन्यांमध्ये तिच्या मोठ्या खेळींसाठी ओळखली जाते.
-
स्मृती मानधना-भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना यंदाच्या विश्वचषकातील सर्वाधिक धावा ३८९ धावा करणारी दुसरी खेळाडू आहे. न्यूझीलंडविरूद्ध सामन्यात स्मृतीने शतकी खेळी केली.
-
हरलीन देओल-हरलीनही भारताची तिसऱ्या क्रमांकावर खेळणारी फलंदाज आहे. हरमनने सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये ४० अधिक धावांच्या खेळी साकारत संघाचा डाव सावरला.
-
जेमिमा रॉड्रीग्ज- टीम इंडियाची छोटा पॅकेट बडा धमाका असलेली जेमिमा भारताच्या सेमीफायनल विजयाची स्टार ठरली. जेमिमा सुरूवातीलच्या सामन्यांमध्ये शून्यावर बाद होत माघारी परतली होती, तिथून ती न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामन्यात भारताच्या विजयात मोलाची भूमिका साकारणारी खेळाडू ठरली.
-
रिचा घोष-भारतीय संघाची पॉवर हिटर फिनिशर असलेल्या रिचा घोषने दक्षिण आफ्रिकाविरूद्ध सामन्यात ९४ धावांची खेळी केली होती. याशिवाय प्रत्येक सामन्यातील रिचाच्या अखेरच्या षटकांतील खेळी महत्त्वाच्या ठरतात.
-
दीप्ती शर्मा-भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा बॅट आणि बॉलने मोठं योगदान देत आहे. दीप्ती शर्माने यंदाच्या विश्वचषकात दोन अर्धशतकं झळकावली. तर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंमध्ये दीप्ती शर्मा १७ विकेट्ससह दुसऱ्या स्थानी आहे.
-
प्रतिका रावल-स्मृती मानधनाची सलामी जोडीदार प्रतिकाला अखेरच्या गट टप्प्यातील सामन्यात दुखापत झाली होती, त्यामुळे ती स्पर्धेबाहेर झाली. प्रतिका स्पर्धेत ३०८ धावा करत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या स्थानी आहे.
-
स्नेह राणा-भारताची अष्टपैलू स्नेह राणा हिने सर्व सामन्यांमध्ये बॅट आणि चेंडूने महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.
-
अमनजोत कौर-अष्टपैलू खेळाडू अमनजोत कौर खालच्या फळीत भारताची महत्त्वाची फलंदाज आहे आणि संघाला वेळप्रसंगी ब्रेकथ्रू मिळवून देणारी गोलंदाज ठरली आहे.
-
क्रांती गौड-भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड ही आपला पहिलाच महिला विश्वचषक खेळत आहे आणि तिने आपल्या गोलंदाजीची छाप पाडली आहे.
-
श्रीचरणी-भारताची युवा फिरकीपटू श्रीचरणीने आपल्या फिरकीने सर्वांना प्रभावित केलं आहे. श्रीचरणी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत १३ विकेट्स घेतल्या असून पाचव्या स्थानी आहे.
-
अरूंधती रेड्डी- भारताची वेगवान गोलंदाज अरूंधतीला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नसली तरी ती फिल्डिंगसाठी अनेकदा मैदानावर उतरली आहे.
-
शफाली वर्मा-भारताची सलामीवीर प्रतिका रावलला अचानक दुखापत झाल्याने तिच्या जागी शफाली वर्माला संधी देण्यात आली.
-
राधा यादव-फिरकीपटू राधाला स्पर्धेत फक्त दोन सामने खेळण्याची संधी मिळाली आणि या सामन्यात त्याने गोलंदाजीने आपली छाप पाडली.
-
उमा छेत्री-यष्टीरक्षक फलंदाज उमाला रिचा घोषच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरूद्ध सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.
-
रेणुका सिंग ठाकूर-भारतीय संघाची महत्त्वाची वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर हिला विश्वचषकातील सर्व सामने खेळण्याची संधी मिळाली नाही, पण ज्या सामन्यांमध्ये तिला संधी मिळाली आहे, त्यामध्ये तिने महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या आहेत. (फोटो सौजन्य-@BCCI)