-

ICC Women’s World Cup 2025: भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकपमधील सेमीफायनलमध्ये चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. (सर्व फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)
-
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना रविवार, २ नोव्हेंबरला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये खेळवला जाईल.
-
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता सुरू होईल आणि नाणेफेक दुपारी २:३० वाजता होईल.
-
सध्या नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये (Dr DY Patil Sports Academy, Navi Mumbai) भारतीय महिला संघ जोरदार सराव करत आहेत.
-
हा सामना जिंकणारा संघ पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकेल.
-
दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे.
-
भारताने याआधी २००५ आणि २०१७ मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
-
भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला, तर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला हरवून अंतिम फेरी गाठली आहे.
-
अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार, यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.
Photos: भारतीय महिला संघाचा डीवाय पाटील स्टेडियममध्ये जोरदार सराव, फायनलमध्ये द. आफ्रिकेशी मुकाबला
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता सुरू होईल.
Web Title: Indian women odi world cup squad practice d y patil stadium navi mumbai final match against south africa sdn