-
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यासाठी कर्णधार शुबमन गिलने धाडसी निर्णय घेतला. त्याने डावखुऱ्या हाताचा फलंदाज साई सुदर्शनला प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवलं.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराच्या निवृत्तीपासून भारतीय संघातील तिसऱ्या क्रमांकाचा तिढा सुटलेला नाही. या क्रमांकावर अनेक फलंदाजांना संधी दिली गेली आहे.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या सामन्यासाठी ४ फिरकी गोलंदाजांना प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं आहे. ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
त्यामुळेच अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा आणि त कुलदीप यादव यांना स्थान दिलं गेलं आहे. (फोटो- जनसत्ता)
-
या संघात साई सुदर्शनच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली गेली आहे. (फोटो- जनसत्ता)
-
साई सुदर्शनला सतत मिळालेल्या संधीचा योग्य फायदा करून घेता आलेला नाही. त्यामुळे गिलने धाडसी निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. (फोटो- जनसत्ता)
Bihar Election Result 2025 Live Updates : काँग्रेसची हालत एमआयएमपेक्षाही वाईट – देवेंद्र फडणवीस